---Advertisement---

Womens World Cup 2022: न्यूझीलंड संघाची कर्णधार चालू सामन्यातून बाहेर; कारण घ्या जाणून

Sophie-Devine
---Advertisement---

आयसीसी महिला विश्वचषक २०२२मधून न्यूझीलंड संघासाठी वाईट बातमी समोर येत आहे. न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिवाइन दुखापतग्रस्त झाली आहे. विश्वचषकातील १९व्या सामन्यात रविवारी (२० मार्च) न्यूझीलंड आणि इंग्लंड संघ आमने- सामने होते. यावेळी फलंदाजी करताना सोफी दुखापतग्रस्त झाल्यामुळे ती रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेली. त्यामुळे ती सामन्याच्या दुसऱ्या डावात इंग्लंडविरुद्ध क्षेत्ररक्षण करण्यासाठी उतरू शकली नाही. तिच्या जागी संघाची उपकर्णधार एमी सदरवेटने संघाची धुरा सांभाळली.

सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंड संघाची कर्णधार सोफी डिवाइनने (Sophie Devine) १५व्या षटकातील पहिल्या चेंडूवर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचा हा प्रयत्न फसला. ती यावेळी दुखापतग्रस्त झाली आणि रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेली. मैदान सोडण्यापूर्वी तिने ४२ चेंडूत ३७ धावा केल्या होत्या.

मात्र, ३९व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर न्यूझीलंडची फलंदाज ली ताहुहू बाद झाली. त्यावेळी डिवाइनला वाटले की, संघाला तिची गरज आहे. त्यामुळे ती पुन्हा मैदानावर परतली. यावेळी तिने ४८ चेंडूंचा सामना करत ४१ धावा ठोकल्या. या धावा करताना तिने ५ चौकारही ठोकले होते.

न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना डिवाइनच्या शानदार खेळीच्या आणि मॅडी ग्रीनच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंड संघासमोर २०४ धावांचे आव्हान ठेवले. मात्र, हे आव्हान इंग्लंडने ४७.२ षटकात ९ विकेट्स गमावत पार केले. तसेच, सामना १ विकेटने खिशात घातला. हा इंग्लंडचा तिसरा विजय होता. दुसरीकडे, न्यूझीलंड संघाने या विश्वचषकातील चौथ्या पराभवाचा सामना केला.

आयसीसी महिला विश्वचषक २०२२मध्ये एकाही सामन्यात पराभूत न झालेल्या संघांमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघाचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत ५ सामन्यात विजय मिळवला आहे, तर दक्षिण आफ्रिकेने ४ विजय मिळवला आहे.

विश्वचषकातील पुढील सोमवारी (२१ मार्च) हॅमिल्टन येथे वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान संघात खेळला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

इंग्लंडने चक्क ‘नंबर वन’ गोलंदाजाला महत्त्वाच्या मालिकेतून वगळले, मग गोलंदाजानेही व्यक्त केला ‘हा’ मानस

IPL2022| धोनीच्या चेन्नईची चिंता वाढली, ‘या’ प्रमुख अष्टपैलू खेळाडूला अद्याप मिळाला नाही व्हिसा

अन् ‘त्या’ चिमणीला लॉर्ड्स संग्रहालयात मिळाली जागा, वाचा काय आहे कहाणी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---