---Advertisement---

दक्षिण आफ्रिकी गोलंदाजाच्या यॉर्करने उडवल्या किवी कर्णधाराच्या दांड्या; शतकही हुकलं, VIDEO VIRAL

On: गुरूवार, मार्च 17, 2022 5:55 PM
Sophie-Devine
---Advertisement---

सध्या महिला विश्वचषक (Womens World Cup 2022) न्यूझीलंडमध्ये खेळला जात आहे. विश्वचषकाचा १६ व्या सामन्यात गुरुवारी (१७ मार्च) दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड संघ आमने-सामने आले. हा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला आणि विश्वचषकातील सलग चौथा विजय मिळवला आहे. या सामन्यात कर्णधार सोफी डिवाइनने शानदार खेळी करत ९३ धावा केल्या आहेत. परंतु ती या सामन्यात आपले शतक पूर्ण करू शकली नाही. सध्या ती बाद होतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

https://www.instagram.com/reel/CbML695oAeF/?utm_source=ig_embed&ig_rid=9fd9dcd9-5f3e-4012-a3a2-bf870f3c9beb

कर्णधार सोफी डिवाइनची विकेट दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज अयाबोंगा खाकाने (Ayabonga Khaka) घेतली. न्यूझीलंडच्या डावाच्या ४१ व्या षटकात ही घटना पाहायला मिळाली. खाकाच्या याॅर्करने षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर डिवाइनला चकित केले. न्यूझीलंडची कर्णधाराला या चेंडूवर मोठी खेळायची होती, परंतु हा चेंडू डिवाइनच्या पॅडला लागला आणि चेंडू सरळ विकेटवर जाऊन आदळला. त्यामुळे ती निराश होऊन तंबूत परतली.

ती अजून काही काळ खेळू शकली असती, परंतु नर्वस नाइंटीजचा तिच्यावर आलेला दबाव आणि अयाबोंगा खाकाचा घातक याॅर्कर या सर्वांचे उत्तर ती देऊ शकली नाही. यामुळे ती शानदार कामगिरी करून देखील आपले शतक पूर्ण करू शकली नाही.

या सामन्यात न्यूझाीलंडने पहिल्यांदा नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यजमान संघाने आफ्रिका संघासमोर २२९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. न्यूझीलंडकडून खेळताना कर्णधार डिवाइनने (Sophie Devine) ९३ धावा, तर एमिली केरने ४२ धावा केल्या, मॅडी ग्रीनने ३० आणि ब्रुक हेलीडने २४ धावा केल्या. गोलंदाजीत दक्षिण आफ्रिकेकडून शबनीम इस्माइलने आणि आयाबोंगाने ३-३ विकेट घेतल्या आहेत.

हे लक्ष्य आफ्रिकेने ८ विकेट गमावत पूर्ण केले आहे. आफ्रिकेचा विश्वचषकातील हा सलग चौथा विजय आहे. गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर, न्यूझीलंड नवव्या, तर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या क्रमांकावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

वॉर्नरने हातोड्याने कराचीच्या खेळपट्टीवर घेतली मेहनत; पाहून पत्नी म्हणाली, ‘तू घरीही अशीच…’

कसोटीच्या चौथ्या डावात आत्तापर्यंत ८ यष्टीरक्षकांनी ठोकलीत शतके; पंत, डिविलियर्ससह आता रिजवानचेही नाव

दक्षिण आफ्रिकेचा न्यूझीलंडवर ऐतिहासिक विजय, पहिल्यांदाच वनडे विश्वचषकात चारली धूळ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---