वेस्ट इंडीज आणि इंग्लंड यांच्यात सध्या तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या कसोटी मालिकेत इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याला संधी दिले गेली नाहीय. आता अँडरसनने या कसोटी मालिकेतून त्याला वगळल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. असे असले तरी, तो लवकरात लवकर संघात पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे.
इंग्लंडचे अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) आणि स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) या दोघांनाही वेस्ट इंडीजविरुद्धच्या या कसोटी मालिकेतून वगळले गेले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍशेस मालिकेत यो दोघांनी चांगली गोलंदाजी केली होती. परंतु, त्यांच्या संघाला ४-० अशा फरकाने पराभव पत्करावा लागला होता. याच पार्श्वभूमीवर इंग्लंडच्या संघात काही बदल केले गेले आहेत. अँडरसन आणि ब्रॉडच्या जागा वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत ख्रिस वोक्स आणि क्रेग ओवरटन यांनी घेतली आहे. इंग्लंड संघ नवीन खेळाडूंची गुणवत्ता आवजमावण्याच्या प्रयत्नात दिसत आहे.
राष्ट्रीय संघातून बाहेर झाल्यानंतर काउंटी संघ लंकाशायरसाठी अँडरसन खेळू इच्छित आहे. परंतु इंग्लंड संघासाठी पुनरागमन करण्याचाही त्याचा प्रयत्न असणार आहे. तो म्हणाला, “जोपर्यंत मला वाटते की, मी सर्वोच्च पातळीवर स्पर्धा करू शकतो, तोपर्यंत मी खेळत राहील. जेव्हा असे वाटायचे बंद होईल, तेव्हा मला हा निर्णय घ्यावा लागेल की, मी काय करू शकतो. ही लंकाशायरमध्ये पुनरामन करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी अप्रतिम प्रदर्शन करण्यासाठी चांगली संधी आहे.”
डेली मेलसोबत बोलताना अँडरसन पुढे म्हणाला की, “माझ्याकडे १५ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळासाठी एक केंद्रिय करार आहे, ज्यासाठी मी त्यांच्याकडून मोठी रक्कम घेतली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात त्याची परतफेड करण्याची माझी इच्छा आहे. त्यांना अजिंक्यपद ट्रॉफी जिंकवून देण्यासठी प्रयत्न केला जाईल.”
दरम्यान, जेम्स अँडरसन हा इंग्लंडचा असा महान गोलंदाज आहे, ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट्स स्वतःच्या नावावर केल्या आहेत. तसेच एकंदरीत पाहता क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज आहे.
महत्वाच्या बातम्या –
वाढदिवस विशेष : कपिल देवचा उजवा हात म्हणून ओळखले जाणारे ‘मदन लाल’
अन् ‘त्या’ चिमणीला लॉर्ड्स संग्रहालयात मिळाली जागा, वाचा काय आहे कहाणी
आरसीबीचे कर्णधारपद हाती घेताच डू प्लेसिसने विरोधी संघासाठी वाजवली धोक्याची घंटी? व्हिडिओ पाहाच