मंगळवारी (दि. 18 जुलै) महिला ऍशेस 2023 मधील वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा वनडे सामना टॅटन येथे खेळला गेला. या सामन्यात इंग्लंड महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघ आमने-सामने होते. हा सामना इंग्लंड महिला संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार 69 धावांनी जिंकला. या विजयात संघाची फलंदाज नॅट सायव्हर-ब्रंट हिचा मोलाचा वाटा उचलला. विशेष म्हणजे, तिने शतकी खेळी साकारल्यामुळे तिला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. या शतकासह नॅटने खास विक्रम आपल्या नावावर केला.
या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडच्या फलंदाजांनी हा निर्णय सपशेल चुकीचा ठरवला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 9 विकेट्स गमावत 285 धावा केल्या होत्या. पावसाच्या व्यत्ययामुळे हे आव्हान कमी करून 44 षटकात 269 धावा करण्यात आले होते. मात्र, हे आव्हान पार करताना ऑस्ट्रेलिया संघ 35.3 षटकात सर्व विकेट्स गमावत 199 धावा केल्या.
नॅटचा विक्रम
या सामन्यात इंग्लंडकडून फलंदाजी करताना संघाची अष्टपैलू आणि वनडे रँकिंगमधील नंबर 1 नॅट सायव्हर-ब्रंट (Nat Sciver-Brunt) हिने जबरदस्त विक्रम रचला. तिने या सामन्यात 149 चेंडूंचा सामना करत 129 धावांची शतकी खेळी साकारली. यामध्ये 1 षटकार आणि 15 चौकारांचा समावेश आहे. अशाप्रकारे तिने सलग शतक ठोकून एक खास विक्रम रचला. खरं तर, नॅट वनडे क्रिकेटमध्ये सलग दोन सामन्यात शतक ठोकणारी इंग्लंडची दुसरी महिला खेळाडू बनली.
Yet another Nat Sciver-Brunt special in the Women's #Ashes 🔥
She has four hundreds against Australia in ODIs, the most by any female player ⭐#ENGvAUS pic.twitter.com/mmbceDkS32
— ICC (@ICC) July 18, 2023
तिने मागील दुसऱ्या वनडेत सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 99 चेंडूत नाबाद 111 धावांची शतकी खेळी साकारली होती. यामध्ये 10 चौकारांचा समावेश होता. नॅटपूर्वी हा विक्रम इंग्लंडची फलंदाज टॅमी ब्यूमाँट हिने केला होता. 2016मध्ये तिने पाकिस्तानविरुद्ध आणि 2018मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अशी कामगिरी केली होती.
नॅटविषयी बोलायचं झालं, तर तिने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मागील 5 डावांमध्ये नॅटने 109*, 148*, 31, 111* आणि 129 असे प्रदर्शन केले आहे.
मालिका खिशात
नॅटव्यतिरिक्त इंग्लंडला 285 धावांचा डोंगर उभारण्यात हीदर नाईट (67) आणि डॅनियल वॅट (43) यांनी मोलाचा वाटा उचलला. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना ऍश्ले गार्डनर आणि जेस जोनासन यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच, मेगन शट आणि अलाना किंग यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून एलिस पेरी (Ellyse Perry) हिने सर्वाधिक धावा केल्या. तिने 58 चेंडू 1 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 53 धावा केल्या. तिच्याव्यतिरिक्त ऍशले गार्डनर हिनेही 41 धावांचे योगदान दिले. इतर एकही फलंदाज खास कामगिरी करू शकली नाही. यावेळी इंग्लंडकडून गोलंदाजी करताना केट क्रॉस हिने सर्वाधिक 3, तर लॉरेन बेन आणि चार्लोट डीन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच, नॅट आणि सोफी एक्लेस्टोन यांनीही प्रत्येकी 1 विकेट नावावर केली. इंग्लंडने या विजयासह वनडे मालिका 2-1ने खिशात घातली. (eng w vs aus w 3rd odi cricketer nat sciver brunt becomes the second england woman with back to back odi hundreds)
महत्त्वाच्या बातम्या-
भारताला विश्वचषक जिंकून देणारा असा खेळाडू, ज्याला कधीच मिळाले नाही कामगिरीचे श्रेय
भारताला विश्वचषक जिंकून देणारे दिग्गज क्रिकेटर, मुलाच्या टीम इंडियातील निवडीवेळी मीटिंग सोडून गेले होते बाहेर