इंग्लंडने संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ साठी १५ खेळाडूंच्या संघाची निवड केली आहे. वेगवान गोलंदाज टायमल मिल्स २०१८ नंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय संघात परतला आहे. टी-२० ब्लास्टमध्ये मिल्स प्रभावी ठरला होता, त्याने ससेक्सला एजबॅस्टन येथे अंतिम फेरी गाठण्यास मदत केली होती. याशिवाय त्याने ‘द हंड्रेड लीग’मध्येही आपले कौशल्य दाखवले होते, ज्यामुळे सदर्न ब्रेवला स्पर्धेच्या पहिल्या हंगामात चषक जिंकण्यात मदत झाली होती.
फेब्रुवारी २०१७ मध्ये इंग्लंडकडून शेवटचा सामना खेळलेल्या मिल्सला संघात स्थान देण्यात आले आहे. त्याने जोफ्रा आर्चरची जागा घेतली आहे, जो हाताच्या शस्त्रक्रियेमुळे वर्षभरासाठी बाहेर आहे.
इंग्लंड क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूड म्हणाले की, “आयसीसी टी -२० विश्वचषक जिंकण्याच्या आव्हानाच्या संभाव्यतेबद्दल आम्ही खूप उत्साहित आहोत. माझा विश्वास आहे की आम्ही एक चांगला संघ निवडला आहे, जो सर्व क्षेत्रांचा चांगली कामगिरी करेल. हा एक असा संघ आहे ज्याच्याकडे यशस्वी होण्याची क्षमता आहे.”
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे इंग्लंडचे सर्व खेळाडू विलगिकरणात होते. त्यानंतर बेन स्टोक्स जुलैमध्ये मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये परतला होता. त्याच्या खेळीमुळे इंग्लडला पाकिस्तानवर ३-० ने विजय मिळवता आला होता. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत इंग्लंडच्या टी-२० विश्वचषक जिंकण्याच्या आशेला धक्का बसला आहे. स्टोक्सनेच २०१९ मध्ये संघाला एकदिवसीय क्रिकेटचा विश्वचषक मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती.
या १५ जणांच्या संघात स्टोक्सव्यतिरिक्त जो रूटचाही समावेश नाही. डावखुरा वेगवान गोलंदाज डेविड विलीही संघात परतला आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या विश्वचषकापूर्वी त्याला संघातून वगळण्यात आले होते. इंग्लंडला स्पर्धेपूर्वी आपला संघ अंतिम करण्यासाठी १० ऑक्टोबरपर्यंतचा वेळ आहे.
आयसीसी टी -20 विश्वचषकासाठी इंग्लंड संघ:
इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलिंग्स, जोस बटलर, सॅम कुरन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, टायमल मिल्स, आदिल रशीद, जेसन रॉय, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड.
राखीव खेळाडू: टॉम कुरन, लियाम डॉसन, जेम्स व्हिन्स.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकासाठी वेस्ट इंडीजचा संघ जाहीर, ६ वर्षांनंतर धाकड गोलंदाजाचे पुनरागमन
टी२० विश्वचषकासाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, मोहम्मद नबीकडे कर्णधारपद; पाहा संपूर्ण टीम