इंग्लंड संघाचा अष्टपैलू बेन स्टोक्स याने 2019 विश्वचषकादरम्यान इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांमधील भारतीय फलंदाजाच्या वर्तणुकीबद्दल आपल्या या पुस्तकात लिहिले आहे. यावेळी त्याने भारतीय फलंदाजांवर टीका केल्या आहेत. यामुळे नव्या वादास तोंड फुटले आहे. त्याचबरोबर त्याने आपल्या पुस्तकात भारतीय संघावर मुद्दाम इंग्लंडविरुद्ध सामना गमावला असल्याचेही आरोप केले आहेत. जेणेकरुन पाकिस्तान संघ विश्वचषकामधून बाहेर पडेल. याबाबतील पाकिस्तानचे माजी गोलंदाज सिकंदर बख्त यांनीही भाष्य केले होते.
बेन स्टोक्सच्या वक्तव्याने पेटला वाद
बेन स्टोक्सने आपले नवीन पुस्तक ‘ऑन फायर’मध्ये भारतीय संघाविरुद्ध विश्वचषक 2019 च्या सामन्याचा उल्लेख केला आहे. बेन स्टोक्स म्हणाला की, ‘जेव्हा एमएस धोनी फलंदाजीसाठी मैदानावर आला होता. तेव्हा भारतीय संघाला 11 षटकांत 112 धावांची गरज होती. त्यानंतर धोनीने विचित्र पद्धतीने फलंदाजी केली आणि त्यामुळेच हा सामना गमावला.’
धोनीने अगोदरच हार मानली
बेन स्टोक्सच्या मतानुसार भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्या सामन्यात विजयी होण्याची जराही इच्छा दाखविली नाही. इतकेच नव्हे तर भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहलीची भागीदारी देखील एक रहस्यमयी असल्याचे स्टोक्सने आपल्या पुस्तकात सांगितले आहे. मात्र, त्यानंतर बेन स्टोक्सने हे विधान अमान्य सांगितले.
भारताच्या पराभवामुळे चाहते झाले निराश
2019 विश्वचषकातील 38 व्या सामन्यात इंग्लंड संघाने भारतीय संघासमोर 338 धावांचे लक्ष्य दिले होते. पण भारतीय संघाचे या निर्धारित षटकांत केवळ 5 गडी बाद 306 धावा अशी कामगिरी केली होती. यामुळे भारतीय संघाने हा सामना 31 धावांनी गमावला होता. भारताच्या या पराभवामुळे चाहते खूप निराश झाले होते. त्या सामन्यात धोनी आणि केदार जाधव नाबाद राहिले होते. परंतु हे दोघेही फलंदाज भारताला विजयापर्यंत पोहोचवू शकले नव्हते.
Ben Stokes writes in his book that India lost to England deliberately to remove Pakistan from world Cup 19 and we predicted it Pakistan India relationship @TheRealPCB @TheRealPCBMedia pic.twitter.com/ioqFSHeeg1
— Sikander Bakht (@Sikanderbakhts) May 28, 2020
फलंदाजी पाहून गांगुलाही आश्चर्य वाटले
धोनीने 31 चेंडूत 42 धावांची खेळी केली होती. त्याचवेळी केदार जाधव 13 चेंडूत 12 धावा करू शकला होता. हे दोघे जेव्हा क्रीजवर आले तेव्हा वेगवान धावांची गरज होती. पण दोघेही संथगतीने खेळत होते. या पराभवानंतर धोनी आणि केदारच्या इच्छाशक्तीवर प्रश्न देखील उपस्थित झाले होते. कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीने धोनी आणि केदारच्या फलंदाजीबद्दल आश्चर्य व्यक्त करत म्हटले होते की, ‘सामने जिंकण्याची जबाबदारी फक्त विराट कोहली आणि रोहित शर्माची नाही. तर सर्व खेळाडूंवर ही जबाबदारी आहे.’
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये दिल्या जाणाऱ्या वागणुकीबद्दल बोलली ‘ही’ चीअरलीडर; सचिन अन् माहीवरही केले वक्तव्य
नवीकोरी विंटेज कार अन् जिवाभावाच्या मित्रांसंगे जेवणावर ताव, ‘माही’चा तो फोटो भन्नाट व्हायरल