इंग्लंड संघाचा आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाचा अष्टपैलू सॅम करनन भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करण्यास सज्ज आहे. याबरोबरच त्याने हे स्पष्ट केले आहे की, त्याच्या आयपीएल संघातील भारतीय खेळाडू हे सध्या त्याच्यासाठी विरोधी खेळाडू असणार आहेत. कारण ही कसोटी मालिका भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध खेळत आहेत.
सॅमने ईएसपीएन क्रिकइन्फो सोबत बोलताना सांगितले की, आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार एमएस धोनीच्या उपस्थितीमुळे संघातील उर्वरित खेळाडूंवर किती परिणाम करतो.
खरं तर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाकडून खेळणाऱ्या ११ खेळाडूंपैकी ३ खेळाडू आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचे भाग आहेत. ते ३ खेळाडू म्हणजे रवींद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा आणि शार्दुल ठाकूर हे खेळाडू आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन हा देखील या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनचा एक भाग आहे.
अशा परिस्थितीत हे खेळाडू मैदानावर एकमेकांना सामोरे येणारच आहेत. याबद्दल, सॅमने क्रिकइन्फोला प्रतिक्रिया देत म्हणाला की, “भारतीय संघात माझे काही मित्र आहेत, त्यांच्यासोबत मी आयपीएलमध्ये खेळतो, पण आत्ता ते येथे मालिका खेळण्यासाठी आले आहेत, त्यामुळे ते माझ्यासाठी प्रतिस्पर्धी खेळाडू आहेत.”
धोनीचे कौतुक करत सॅम म्हणाला की, “एमएस धोनी सारख्या खेळाडूचा खूप प्रभाव आहे, त्याने त्याच्या कारकिर्दीत बरेच यश साध्य केले आहे. म्हणूनच एक तरुण खेळाडू म्हणून अशा स्थितीत आपल्या स्वतःलाच आपोआपच आत्मविश्वास मिळतो. हा एक चांगला हंगाम आहे. जेव्हा या वर्षी आयपीएल भारतात होत होती, तेव्हा आम्ही गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर होतो. सीएसके एक चांगला संघ आहे आणि मला आशा आहे की आगामी काळामध्येही संघासाठी अधिक योगदान देण्यास सक्षम होईल.”
भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. त्यानंतर उर्वरित आयपीएल २०२१ हंगामाला सुरुवात होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
तब्बल ६ कोटींचे बक्षीस, क्लास वनची पोस्ट आणि बरंच काही! पाहा सुवर्णपदक विजेत्याला काय काय मिळणार?
खराब फॉर्मात असलेल्या पुजाराचे कसोटी कारकिर्द धोक्यात? ‘हा’ धुरंधर घेऊ शकतो जागा
तेंडुलकर ते सेहवाग; क्रिकेटविश्वातून ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रावर कौतुकाचा वर्षाव