---Advertisement---

इंग्लंडचा अष्टपैलू स्टोक्सची भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार, ‘हा’ खेळाडू घेणार जागा

On: शुक्रवार, जुलै 30, 2021 10:26 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ जून महिन्यापासून इंग्लंड दौऱ्यावर असून ४ ऑगस्टपासून त्यांना इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. तत्पुर्वी इंग्लंड संघासाठी वाईट बातमी येत आहे. इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्स या पूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. स्टोक्सने स्वत: या मालिकेतून माघार घेण्यासाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला विनंती केली आहे.

आपल्या डाव्या हाताच्या बोटाला झालेल्या दुखापतीतून पूर्णपणे बरे होण्यासाठी आणि स्वत:च्या मानसिक आरोग्यावर लक्ष देण्यासाठी त्याने तात्काळ प्रभावाने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला आहे. त्याच्याजागी क्रेग ओव्हरटन याला इंग्लंडच्या कसोटी संघात सहभागी करण्यात आले आहे.

https://twitter.com/ICC/status/1421147285145018375?s=20

ईसीबीने यासंदर्भात माहिती दिली आहे की, “स्टोक्सने भारताविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. तो अजूनही डाव्या हाताच्या बोटाला झालेल्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही. या दुखापतीतून सावरण्यासाठी आणि स्वतला मानसिकदृष्या पूर्णपणे निरोगी बनवण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला आहे. ईसीबी त्याच्या या निर्णयाचे पूर्णपणे समर्थक करते आहे. तो क्रिकेटपासून दूर असतानाच्या अवधीदरम्यान आम्ही त्याला शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करू.”

स्टोक्सच्या जागी इंग्लंड कसोटी संघात सहभागी झालेला क्रेग ओव्हरटोन हा गोलंदाजी अष्टपैलू आहे. त्यालाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा थोडाफार अनुभव असून आतापर्यंत या २७ वर्षीय अष्टपैलूने ४ कसोटी खेळले आहेत. दरम्यान नाबाद ४१ धावांच्या सर्वोत्तम खेळीसह त्याने १२४ धावांची कामगिरी केली आहे. सोबतच ९ विकेट्सही घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

एक वर्ष बंदी आणि ३८ लाखांचा दंड, बायो बबल तोडणाऱ्या ‘त्या’ श्रीलंकन खेळाडूंवर कारवाई

धवन ब्रिगेडमधील ‘या’ क्रिकेटरसाठी बंद झाला टी२० विश्वचषकाचा मार्ग? पुरेपूर संधी मिळूनही झाला फ्लॉप

व्वा रे पठ्ठ्या! मिचेल स्टार्कच्या भावाने टोकियो ऑलिंपिकमध्ये दाखवला दम, मिळवले फायनलचे तिकीट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---