भारत विरुद्ध इंग्लंडच्या बहुप्रतिक्षित चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला येत्या फेब्रुवारी महिन्यात सुरुवात होत आहे. या मालिकेद्वारे भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली पुनरागमन करणार आहे. यापूर्वी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर पालकत्व रजेमुळे माघार घेतली होती. मात्र पुनरागमनानंतर मागील मालिकेतील प्रदर्शनाची कमी इंग्लंडविरुद्ध पूर्ण करण्याच्या तयारीत असेल.
इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अली याला याच गोष्टीची चिंता सतावत आहे. इंग्लंडचे गोलंदाज विराटची विकेट कशी काढतील?, हा प्रश्न त्यांच्या चिंतेचे कारण ठरला आहे.
विराटला बाद कसे करावे? – मोईन अली
रविवारी (३१ जानेवारी) एका व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये बोलताना मोईन अलीने विराटसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर विराटला आता दमदार प्रदर्शनसाठी भरपूर प्रेरणा मिळाली असेल. यामुळे इंग्लंड संघाच्या अडचणीत वाढ झाली असल्याचे त्याने सांगितले आहे.
तो म्हणाला की, “विराट निश्चितपणे एक शानदार खेळाडू आहे. तो विश्वस्तरीय फलंदाज आहे. तो नेहमीच चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरित असतो. मला विश्वास आहे की, ऑस्ट्रेलियात भारतीय संघाने केलेल्या उत्कृष्ट प्रदर्शनानंतर त्याला अजून जास्त प्रेरणा मिळाली असेल. कारण तो फक्त आपल्या बाळाच्या जन्मासाठी भारतात परतला होता. अशात आम्ही त्याला बाद कसे करणार?, याची मला काळजी वाटत आहे.”
विराटची नाही कोणतीही कमजोरी – मोईन अली
तसेच पुढे बोलताना मोईन अली म्हणाला की, “विराटची कोणतीही कमजोरी नाही. म्हणूनच आम्हाला त्याच्या विकेटची चिंता लागली आहे. असे असले तरी, आमच्याकडे जेम्स अंडरसन, स्टुअर्ट ब्रॉड यांच्यासारखे मजबूत वेगवान गोलंदाज उपलब्ध आहेत. मला त्यांच्या क्षमतेवर विश्वास आहे. ते कोणत्या-ना-कोणत्या पद्धतीने या समस्येचा तोडगा शोधून काढतील.”
फेब्रुवारीत सुरू होणार भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका
इंग्लंडच्या भारत दौऱ्यात दोन्ही संघ कसोटी, वनडे आणि टी२० मालिका खेळणार आहेत. भारत विरुद्ध इंग्लंड संघातील दौऱ्याची सुरुवात ५ फेब्रुवारीपासून चेन्नई येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याने होणार आहे. या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना १२ फेब्रुवारीपासून चेन्नईतच खेळविण्यात येणार आहे. तर अखेरचे दोन सामने अहमदाबादच्या नवीन मोटेरा मैदानावर खेळवले जातील.
महत्त्वाच्या बातम्या-
वानखेडे स्टेडियमवर ९ मार्चला सुनील गावसकर यांचा होणार खास सन्मान? कारणही आहे तसंच विशेष
केवळ एक सामनावीर अन् विराट कोहली टाकेल तब्बल ५ दिग्गजांना मागे
ऑस्ट्रेलिया दौरा गाजवून परतलेल्या नटराजनने केलं मुंडन, फोटो भन्नाट व्हायरल