सध्या जगभरात वर्णभेदाविरुद्ध आवाज उठवला जात असून यासाठी ब्लॅक लाईव्ह मॅटर्स ही चळवळ सुरु आहे. या चळवळीला इंग्लंड आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघांनी पाठिंबा दिला आहे.
आजपासून(८ जूलै) इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील आजपासून सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या आधी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी गुडघ्यावर बसून ब्लॅक लाईव्ह मॅटर्स चळवळीला पाठिंबा दिला आहे.
अमेरिकेमध्ये यावर्षी मेमध्ये जॉर्ज फ्लॉयडची हत्या झाल्यानंतर वर्णभेदाविरुद्ध मोठ्या प्रमाणात जगभरातून आवाज उठवण्यात आला.
त्याचमुळे वर्णभेदाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी सुरु झालेल्या ब्लॅक लाईव्ह मॅटर्स चळवळीला आज इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघाने पाठिंबा दिला आहे. दोन्ही संघांमधील खेळाडूंच्या जर्सीच्या कॉलरवरही ब्लॅक लाईव्ह मॅटर्स चळवळीचा लोगो सुद्धा प्रिंट करण्यात आला आहे.
Players and umpires took a knee before the start of play in support of the Black Lives Matter movement 💪 #ENGvWI pic.twitter.com/cwneMBOGxv
— ICC (@ICC) July 8, 2020
याबरोबरच या सामन्याआधी वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सर एव्हर्टन वीक्स आणि कोरोना व्हायरसमुळे जीव गमवावा लागलेल्या लोकांना इंग्लंड आणि वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी १ मिनिट शांतता राखत श्रद्धांजलीही वाहिली आहे. सर एव्हर्टन वीक्स यांचे मागील आठवड्यात निधन झाले होते. हे सर्व करताना खेळाडूंनी सोशल डिस्टसिंगचे नियम पाळले होते.
इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमधील या मालिकेने जवळजवळ ४ महिन्यांच्या आंतराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली आहे. ही मालिका कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करुन खेळवण्यात येणार आहे.
या मालिकेसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहता येणार नाही. तसेच गोलंदाजांना चेंडूला थुंकीही लावता येणार नाही. तसेच खेळाडूंना हस्तांदोलनही करता येणार नाही. याबरोबरच खेळाडूंचे आणि स्टाफ सदस्यांना सातत्याने तपासण्यातही येणार आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
बेन स्टोक्स इंग्लंडचा ८१वा कर्णधार; पहा, कोणत्या संघाचे झाले आहेत किती कर्णधार?
नाही होणार भारत पाकिस्तान ऐतिहासिक लढत, ही महत्त्वाची स्पर्धा झाली रद्द
लेकीने बापाला वाढदिवसाला काय भेट द्यावं, हे ५ वर्षांच्या झिवा धोनीने जगाला दाखवून दिलं