जूनपासून इंग्लंडसाठी मायदेशातील क्रिकेट हंगाम सुरु होत आहे. त्यांच्यासमोर पहिले आव्हान न्यूझीलंडचे आहे. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात २ जूनपासून २ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. मालिकेसाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने १५ जणांचा इंग्लंड संघ जाहीर केला आहे. या संघात काही युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
जो रुटच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंड कसोटी संघात ग्लॉस्टरशारचा यष्टीरक्षक फलंदाज जेम्स ब्रेसी आणि ससेक्सचा वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सन यांना पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. या दोघांनी काऊंटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. ब्रेसी याने काऊंटी चॅम्पियनशीप २०२१ स्पर्धेत ५ सामन्यात ५३.११ च्या सरासरीने ४७८ धावा केल्या आहेत. तसेच रॉबिन्सनने ५ सामन्यात १४.७२ च्या सरासरीने २९ विकेट्स घेतल्या आहेत.
याशिवाय या मालिकेतून बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर हे दोघे दुखापतीमुळे बाहेर आहेत. तर आयपीएल २०२१ मध्ये खेळलेल्या इंग्लंडच्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असल्याने त्यांचाही या मालिकेसाठी इंग्लंडच्या संघात समावेश नाही. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध जोस बटलर, जॉनी बेअरस्टो, मोईन अली, सॅम करन, ख्रिस वोक्स, असे अनुभवी खेळाडू खेळताना दिसणार नाहीत.
संघ निवडीबद्दल इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिलव्हरवूड म्हणाले, ‘कसोटी क्रिकेटचा हंगाम आकर्षक असेल. जगातील अव्वल संघ असलेल्या न्यूझीलंड आणि भारत या संघांविरुद्ध खेळल्याने आमच्यासाठी फायद्याचेच असेल. कारण आम्हाला वर्षाच्या अखेरिस ऑस्ट्रेलियामध्ये ऍशेस मालिका खेळायची असल्याने आम्ही आमच्या खेळात सुधारणा करत राहू.’
तसेच ते पुढे म्हणाले, ‘काही खेळाडू दुखापतीमुळे उपलब्ध नाही. तर काहींना विश्रांती देण्यात आली आहे. यामुळे आम्हाला त्या खेळाडूंना संधी देता येईल जे गेल्या वर्षभरात इंग्लंड संघातून बाहेर राहिले आहेत. जेम्स ब्रेसी आणि ऑली रॉबिन्सन हे कसोटी संघात समावेशासाठी पात्र होते. त्यांनी या हंगामात काऊंटी चॅम्पियनशीपमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तसेच त्यांनी गेल्या दीडवर्षात मैदानात आणि विविध शिबिरांमध्ये इंग्लंड लायन्ससाठी (इंग्लंड अ संघ) चांगले प्रदर्शन केले आहे.
🏴 James Bracey and Ollie Robinson get their maiden Test call-ups as England name a 15-man squad for their two-Test series against New Zealand, beginning 2 June.#ENGvNZ pic.twitter.com/2Ffx01TFmq
— ICC (@ICC) May 18, 2021
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी असा आहे इंग्लंड संघ –
जो रूट(कर्णधार), जेम्स अँडरसन, जेम्स ब्रेसी(यष्टीरक्षक), स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, झॅक क्रॉली, बेन फोक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, क्रेग ओव्हरटन, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, डॉम सिब्ली, ऑली स्टोन, मार्क वुड.
महत्त्वाच्या बातम्या –
न्यूझीलंडच्या नील वॅगनरनचा सराव होण्यासाठी ‘हा’ युवा गोलंदाज करणार भारतीय संघाला मदत
फुटबॉलपटू राहुल चाहर आणि ज्योतिषी सौरभ तिवारी, मुंबई इंडियन्सने शेअर केला मजेशीर व्हिडिओ