जगातील सर्वात प्रतिष्ठेची कसोटी मालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऍशेस मालिकेतील चौथा कसोटी सामना 19 जुलैपासून सुरू होईल. मँचेस्टर येथे होणाऱ्या या सामन्यासाठी दोन दिवस आधीच इंग्लंडने आपला अंतिम 11 चा संघ घोषित केला असून, या संघात अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याचे पुनरागमन झाले. त्याने ओली रॉबीन्सन याची जागा घेतली.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामना जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ या मालिकेत सहभागी झाला आहे. ऑस्ट्रेलिया संघाने आपल्या कामगिरीतील सातत्य कायम ठेवत पहिल्या दोन सामन्यात यजमान संघाला पराभूत केले. हेडिंगला येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात इंग्लंडसाठी करा अथवा मरा अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी संघात पुनरागमन करत असलेल्या वेगवान गोलंदाज मार्क वूड व अष्टपैलू ख्रिस वोक्स यांनी संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत निर्णायक कामगिरी करताना इंग्लंडला विजय मिळवून दिला. त्यामुळे इंग्लंडचे मालिकेतील आव्हान कायम राहिले.
उभय संघातील चौथा सामना 19 जुलैपासून मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या संघात केवळ एक बदल करताना अनुभवी जेम्स अँडरसन याला संधी दिली. अँडरसन मालिकेतील पहिले दोन सामने खेळला होता. मात्र, त्याला अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आलेले. मात्र, असे असले तरी, आता इंग्लंड संघ व्यवस्थापनाने त्याला पुन्हा एकदा खेळवण्याचा निर्णय घेतला. मँचेस्टर त्याचे होम ग्राउंड असल्याने इंग्लंड संघाला याचा फायदा होऊ शकतो. तो ओली रॉबिन्सनची जागा घेईल.
चौथ्या कसोटीसाठी इंग्लंड संघ:
बेन बकेट, झॅक क्राऊली, मोईन अली, जो रूट, हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, ख्रिस वोक्स, मार्क वूड, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन.
(England Announced Playing XI For Fourth Ashes Test Anderson Comeback)
महत्वाच्या बातम्या-
विंडीज दौऱ्यानंतर द्रविड अँड कंपनीला मिळणार ब्रेक, प्रशिक्षकपदाची जबाबदारी कुणाच्या खांद्यावर?
‘मी पुढील 10-12 वर्षे कार्लोसचं…’, 20व्या वर्षी विम्बल्डनचा किताब जिंकणाऱ्या अल्कारेझचा फॅन बनला सचिन