सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. यातील पहिला कसोटी सामना पार पडला असून त्यात भारतीय संघाने 1 डाव आणि 141 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र, आता असे वृत्त समोर येत आहे की, या मालिकेनंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना विश्रांती दिली जाईल.
बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमधील (National Cricket Academy) प्रशिक्षक कर्मचारी आयर्लंड दौऱ्यावर भारतीय संघासोबत असेल. राहुल द्रविड (Rahul Dravid) याच्यासोबतच भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड (Vikram Rathour) आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे (Paras Mhambrey) हे ऑगस्टमध्ये यूएसएहून परततील. तिथेच वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (West Indies vs India) संघातील अखेरचे दोन टी20 सामने खेळले जाणार आहेत.
आशिया चषकासाठी दिली विश्रांती
माध्यमांतील वृत्तांनुसार, प्रशिक्षक कर्मचाऱ्यांबाबत हा निर्णय घेण्यामागील मुख्य उद्देश आशिया चषक 2023पूर्वी त्यांना विश्रांती देणे आहे. आशिया चषक 31 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यानंतर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. त्यानंतर वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे.
व्हीव्हीएस लक्ष्मणसोबत कोण जाणार?
भारतीय संघाच्या प्रशिक्षणाची जबाबदारी व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) याच्या खांद्यावर असेल. लक्ष्मण सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख आहे. त्याच्यासोबत फलंदाजी आणि गोलंदाजी प्रशिक्षकही असतील. त्यांची निवड सितांशू कोटक, ऋषिकेश कानिटकर (फलंदाजी) आणि ट्राय कूली तसेच साईराज बहुतुले (गोलंदाजी) यांच्यातून केली जाईल. लक्ष्मण मागील वर्षी जूनमध्ये आयर्लंड दौऱ्यावरही भारतीय संघाचा प्रशिक्षक होता.
#TeamIndia Batting Coach Vikram Rathour heaps praise on @imVkohli 👍#WIvIND pic.twitter.com/5H1K4J1J6F
— BCCI (@BCCI) July 16, 2023
भारतीय संघाला आयर्लंडविरुद्ध 18, 20, आणि 23 ऑगस्ट रोजी डब्लिन येथे 3 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळायचे आहेत.
कोण असेल कर्णधार?
अद्याप आयर्लंडविरुद्धच्या भारतीय संघाची घोषणा झाली नाहीये. मात्र, असे म्हटले जात आहे की, हार्दिक पंड्या या संघाचे नेतृत्व करेल. नवीन निवड समितीचा अध्यक्ष अजित आगरकर लवकरच वेस्ट इंडिजला पोहोचेल. तो दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान त्रिनिदादला पोहोचू शकतो.
बुमराहचे पुनरागमन, राहुलचं काय?
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतून पुनरागमन करू शकतो. बुमराहने अलीकडे वेगाने बरा होत आहे. मात्र, श्रेयस अय्यर याच्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाहीये. दुसरीकडे, केएल राहुल याची आयर्लंड आणि आशिया चषकात पुनरागमन करण्याची कोणतीही शक्यता नाहीये. (head coach rahul dravid and coaching staff will be rested for ireland tour reports)
महत्वाच्या बातम्या-
पठ्ठ्याचा नादच खुळा! पाकिस्तानविरुद्ध ठोकली 10वी कसोटी Century; 7 पैकी ‘या’ देशाविरुद्ध सर्वाधिक शतके
अमेरिकन लीगमध्ये डी कॉकने एका ओव्हरमध्ये पकडले 3 झेल, पण ‘या’ कॅचने वेधले आख्ख्या जगाचे लक्ष, Video