पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. यातील गाले मैदानावरील पहिल्या कसोटी सामन्याला रविवारपासून (दि. 16 जुलै) सुरुवात झाली. या सामन्यातील दुसऱ्या दिवशी श्रीलंका संघाचा स्टार फलंदाज धनंजय डी सिल्वा याने शानदार शतक झळकावणाची कामगिरी केली. विशेष म्हणजे, त्याने कसोटीत सर्वाधिक शतके पाकिस्तानविरुद्धच झळकावली आहेत. चला त्याच्या या विक्रमाबाबत जाणून घेऊयात…
या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत संघाने 6 विकेट्स गमावत 242 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी धनंजय डी सिल्वा (157 चेंडूत 94 धावा) आणि रमेश मेंडिस (2 चेंडूत 0 धाव) यांनी फलंदाजीला सुरुवात केली. यावेळी शाहीन आफ्रिदी टाकत असलेल्या 74व्या षटकातील पहिल्या चेंडूवर एक धाव घेत आपले शतक झळकावले. हे शतक करण्यासाठी त्याने 175 चेंडू खेळले. यामध्ये 3 षटकार आणि 10 चौकारांचा समावेश होता. हे शतक झळकावत डी सिल्वाने खास पराक्रम केला.
धनंजय डी सिल्वाचे 50व्या कसोटीत 10वे शतक
धनंजय डी सिल्वा (Dhanajaya De Silva) याचे हे कसोटीतील 10वे शतक होते. विशेष म्हणजे, धनंजयचा हा 50वा कसोटी सामना आहे. अशात आपल्या कसोटी सामन्यांचं अर्धशतक करत त्याने कारकीर्दीतील 10वे शतक झळकावण्याचा पराक्रम केला. खास बाब अशी की, त्याने या 10 शतकांपैकी सर्वाधिक शतके ही पाकिस्तानविरुद्ध केली आहेत.
In his 50th Test match, he smashes his 10th century! 🏏💯 🎉#SLvPAK pic.twitter.com/TFdUkZc7b5
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) July 17, 2023
डी सिल्वाने पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक 3 शतके झळकावली आहेत. तसेच, बांगलादेशविरुद्ध 2 शतके केली आहेत. याव्यतिरिक्त पाच शतके त्याने भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूजीलंड, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे संघांविरुद्ध ठोकली आहेत. (10th Test hundred for Dhananjaya De Silva In his 50th Test match)
धनंजय डी सिल्वाची कसोटी शतके (संघांनुसार)
3 शतके, विरुद्ध- पाकिस्तान
2 शतके, विरुद्ध- बांगलादेश
1 शतक, विरुद्ध- भारत
1 शतक, विरुद्ध- ऑस्ट्रेलिया
1 शतक, विरुद्ध- न्यूझीलंड
1 शतक, विरुद्ध- वेस्ट इंडिज
1 शतक, विरुद्ध- झिम्बाब्वे
महत्वाच्या बातम्या-
अमेरिकन लीगमध्ये डी कॉकने एका ओव्हरमध्ये पकडले 3 झेल, पण ‘या’ कॅचने वेधले आख्ख्या जगाचे लक्ष, Video
पाकिस्तानी गोलंदाजाचा धक्कादायक खुलासा! म्हणाला, ‘मी सेहवागला भडकवून…’