भारतीय संघ आणि खेळाडूंविषयी पाकिस्तानचे आजी-माजी खेळाडू नेहमीच भाष्य करत असतात. अनेकदा त्यांच्या वक्तव्याने माध्यमांमध्ये जोरदार चर्चा रंगते. आताही असंच काहीसं घडलं आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज राणा नावेद उल हसन याने भारतीय संघाचा माजी दिग्गज सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग याच्याविषयी मोठे भाष्य केले आहे. तो म्हणाला आहे की, भारतीय फलंदाजांमध्ये सेहवागला बाद करणे सर्वात सोपे होते. आता या वक्तव्यामुळे क्रिकेटविश्वात चर्चांना उधाण आले आहे.
काय म्हणाला नावेद?
राणा नावेद उल हसन (Rana Naved Ul Hasan) याने एका पॉडकास्टमध्ये बोलताना 2004-05 भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघातील एका सामन्याचा उल्लेख केला. यावेळी त्याने सांगितले की, कशाप्रकारे त्याने वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याला भडकवून बाद केले होते.
“मी तुम्हाला एक घटना सांगतो. एक सामना होता, जिथे सेहवाग 85 धावांवर खेळत होता. मी 2004-05 मालिकेबद्दल बोलत आहे, ज्यामध्ये आम्ही जिंकत होतो. मी त्या मालिकेत मालिकावीर होतो. ही मालिका अशी होती की, आम्ही 2-0ने मागे होते. ही 5 सामन्यांची मालिका होती. मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात सेहवाग मोठे फटके मारत होता. भारतीय संघाने जवळपास 300 धावा केल्या होत्या आणि सेहवाग 85च्या आसपास होता. मी इंझी भाईला मला गोलंदाजी देण्यास सांगितले. मी एक संथ उसळी चेंडू टाकला आणि त्याच्या जवळ जाऊन बोललो, तुला खेळता येत नाही का? जर तू पाकिस्तानात असता, तर मला वाटत नाही की, तू आंतरराष्ट्रीय संघातही येऊ शकला असता.”
नावेदने पुढे सांगितले की, “सेहवागनेही प्रत्युत्तर देत काहीतरी म्हटले. त्यानंतर मी इंझमामला सांगितले की, हा पुढच्या चेंडूवर बाद होईल आणि तेदेखील माझ्या विधानाचे परिणाम पाहून चकित झाले. मी एक धिम्या गतीचा चेंडू टाकला आणि रागात असलेल्या सेहवागने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण तो बाद झाला. ती विकेट एवढी महत्त्वाची होती की, आम्ही तो सामना जिंकलो. या अशा काही वेगवान गोलंदाजांच्या खास पद्धती असतात.”
तो पुढे बोलताना असेही म्हणाला की, “भारतीय फलंदाजांमध्ये सेहवागला बाद करणे सर्वात सोपे होते. तसेच, राहुल द्रविडची विकेट घेणे सर्वात कठीण काम होते.”
सेहवागची पाकिस्तानविरुद्धची आकडेवारी
भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याची पाकिस्तानविरुद्धची आकडेवारी पाहिली, तर ते चकित करणारे आहेत. सेहवागने पाकिस्तानविरुद्ध कसोटी आणि वनडे मिळून एकूण 40 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 2347 धावा केल्या आहेत. त्याने 309 ही कसोटीतील आपली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्यादेखील पाकिस्तानविरुद्ध मुल्तान येथे केली होती. कसोटीत पाकिस्तानविरुद्ध खेळताना सेहवागची सरासरी ही तब्बल 91.14 इतकी राहिली आहे. (pakistan former fast bowler claims to dismiss virender sehwag easily with his tricks read here)
महत्वाच्या बातम्या-
अय्यो! ब्रॉड नाही, तर संघसहकारीच निघाला त्याच्या पत्नीचा आवडता क्रिकेटर, स्वत:च केलाय खुलासा
अर्रर्र…’अशी’ वेळ कुणावरच येऊ नये! विराटच्या संघसहकाऱ्याला मिळाली स्वत:च्या चुकीची शिक्षा, पाहा व्हिडिओ