सध्या इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस 2023 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिले 3 सामने पार पडले आहेत. यामधील 2 सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजय मिळवण्यात यश आले आहे, तर एक सामना इंग्लंडने जिंकला आहे. अशात दोन्ही संघात 19 जुलैपासून चौथा कसोटी सामना खेळला जाणार आहे. या कसोटीपूर्वी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने मोठा खुलासा केला आहे. त्याने सांगितले आहे की, त्याच्या पत्नीचा आवडता क्रिकेटपटू तो नाहीये. चला तर, ब्रॉडच्या पत्नीला आवडणाऱ्या क्रिकेटपटूबद्दल जाणून घेऊयात…
ब्रॉड नाहीये त्याच्या पत्नीचा आवडता क्रिकेटपटू
एका वृत्तपत्राच्या स्तंभात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याने म्हटले की, “ख्रिस वोक्स (Chris Woakes) अद्भूत क्रिकेटपटू आहे. माझी पत्नी मोली हिने मला सांगितले की, तो तिचा आवडता क्रिकेटपटू आहे. पत्नीने सांगितल्यानंतर मी तिला मी कुठे आहे विचारले. यावर तिने म्हटले की, तू दुसऱ्या स्थानी आहे. मी यासाठी तिला खूप खूप धन्यवाद दिला. मी त्याची सर्वाधिक प्रशंसा करू शकतो, ती अशी आहे की, त्याने दोन विश्वचषक अंतिम सामने जिंकण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. मात्र, मागील आठवड्यात हेडिंग्लेमध्ये ऍशेसच्या तिसऱ्या सामन्यात त्याने सर्वोत्तम अष्टपैलू योगदान दिले होते.”
https://www.instagram.com/reel/Cue2U0TAGoC/?utm_source=ig_embed&ig_rid=1b6b592d-0bd8-4681-b5fa-9028ef61e1f4
स्टुअर्ट ब्रॉड 600 विकेट्सच्या जवळ
खरं तर, इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड 600 कसोटी विकेट्सच्या खूपच जवळ आहे. त्याने याविषयी म्हटले की, “ज्यावेळी मी या हंगामाची सुरुवात 576 विकेट्ससोबत केली होती, तेव्हा मी कधीच विचार केला नव्हता की, मी 600 विकेट्सच्या जवळ पोहोचण्यासाठी पुरेसे खेळू शकेल. मात्र, मला याचा अभिमान आहे की, मी या हंगामात चार कसोटी सामने खेळलो. यामध्ये आयर्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याचाही समावेश आहे.”
विशेष म्हणजे, स्टुअर्ट ब्रॉड याचा जलवा ऍशेस 2023 (Ashes 2023) मालिकेदरम्यानही पाहायला मिळत आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 3 सामन्यात इंग्लंडसाठी सर्वाधिक 16 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. (ashes 2023 fast bowler stuart broad reveals his wife favourite cricketer name know here)
महत्वाच्या बातम्या-
अर्रर्र…’अशी’ वेळ कुणावरच येऊ नये! विराटच्या संघसहकाऱ्याला मिळाली स्वत:च्या चुकीची शिक्षा, पाहा व्हिडिओ
काळीज तोडणारी बातमी! 20 वर्षीय मुलाचे क्रिकेट खेळताना निधन, हृदयविकाराच्या झटक्याने घेतला जीव