---Advertisement---

आता इंग्लंडची गोलंदाजी अधिकच खूंखार! तिसऱ्या कसोटीसाठी संघात मोठे बदल, पाहा संपूर्ण स्क्वॉड

On: सोमवार, जुलै 7, 2025 8:27 PM
---Advertisement---

England squad announced for third Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळली जात असलेली 5 सामन्यांची कसोटी मालिका सध्या रोमांचक वळणावर आहे. इंग्लंडने लीड्समध्ये खेळलेला पहिला कसोटी सामना जिंकला, तर भारताने दमदार पुनरागमन करत एजबॅस्टनमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत बाजी मारली. आता दोन्ही संघ 10 जुलैपासून लंडनच्या लॉर्ड्सवर तिसरा कसोटी सामना खेळतील. तत्पूर्वी इंग्लंडने तिसऱ्या कसोटीसाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे. (England squad for Lord’s Test)

इंग्लंडने भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. संघात वेगवान गोलंदाज गस एटकिंसनचा समावेश करण्यात आला आहे. गस एटकिंसन आणि जोफ्रा आर्चर यांच्या उपस्थितीमुळे इंग्लंडचा वेगवान गोलंदाजी विभाग खूप धोकादायक दिसत आहे. आर्चरचा दुसऱ्या कसोटीसाठीही 15 सदस्यीय संघात समावेश होता, परंतु त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती. (Jofra Archer comeback Test cricket)

तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा 16 सदस्यीय संघ- बेन स्टोक्स (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस एटकिंसन, शोएब बशीर, जैकब बेथल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्से, सॅम कुक, जॅक क्रॉली, बेन डकेट, जेमी ओवर्टन, ओली पोप, जो रूट, जैमी स्मिथ, जोश टंग आणि क्रिस वोक्स (England squad announced for third Test)

रिपोर्ट्सनुसार, गस एटकिंसनला थेट लॉर्ड्स कसोटीच्या प्लेइंग इलेवनमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते. याशिवाय तिसऱ्या कसोटीत जोफ्रा आर्चरच्या खेळण्याचीही शक्यता आहे. जर या दोघांना संधी मिळाली तर जोश टंग आणि ब्रायडन कार्सला संघातून वगळले जाऊ शकते. याशिवाय इतर कोणत्याही बदलाची अपेक्षा नाही. (Lord’s Test playing XI prediction)

एजबॅस्टनमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 587 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडनेही पहिल्या डावात 407 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताने 6 विकेट्सवर 627 धावा करून डाव घोषित केला. त्यानंतर फायनल डावात इंग्लंडचा संघ केवळ 271 धावांवरच ढेपाळला. दरम्यान भारताने 336 धावांनी इंग्लंडला धूळ चारत ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली. (Edgbaston Test match result)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---