इंग्लंडची यष्टिरक्षक फलंदाज एमी जोन्स आणि ऑस्ट्रेलियाची गोलंदाज पिप्पा क्लेरी यांचा साखरपूडा झाला आहे. दोघीही एकमेकींसोबत बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशीपमध्ये होत्या. क्लेरी आणि जोन्स या महिला क्रिकेटपटू आहेत. दोघींनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना त्यांच्या साखरपुड्याची माहिती दिली. एमी आणि क्लेरीनं एंगेजमेंट सोहळ्यासाठी फार कमी लोकांना आमंत्रित केलं होतं.
क्लेरी आणि एमी यांची पहिली भेट महिला बिग बॅश लीगदरम्यान झाली होती. त्या दोघीही पर्थ स्कॉचर्सकडून खेळत होत्या. यानंतर दोघींची मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि आता दोघींचा साखरपुडा झाला. एमी आणि क्लेरीनं इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचा फोटो शेअर केला आहे. चाहते यावर कमेंट करून दोघींचं अभिनंदन करत आहेत.
View this post on Instagram
31 वर्षीय एमी जोन्सचा जन्म 13 जून 1993 रोजी वेस्ट मिडलँड्समध्ये झाला. तिनं 2013 मध्ये वनडेमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून ती इंग्लंडच्या एकदिवसीय संघाचा नियमित भाग आहे. जोन्सनं 91 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1951 धावा ठोकल्या आहेत. एमीची वनडेतील सर्वोत्तम धावसंख्या 94 धावा आहे. एमी जोन्सनं 2019 मध्ये इंग्लंडकडून कसोटी पदार्पण केलं. तिनं आतापर्यंत 6 कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये 116 धावा केल्या आहेत. याशिवाय तिनं 107 टी20 सामनेही खेळले आहेत. या कालावधीत तिच्या बॅटमधून 1515 धावा निघाल्या आहेत.
पिप्पा क्लेरीचा जन्म 17 जुलै 1996 रोजी झाला. ती जोन्सपेक्षा तीन वर्षांनी लहान आहे. ती क्लियरी स्कॉर्चर्स आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया महिला सारख्या संघांसाठी खेळली आहे. परंतु तिला अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळालेली नाही. याआधीही अनेक इंग्लिश खेळाडूंनी एकमेकांशी लग्न केलं आहे. मात्र एमी जोन्सनं दुसऱ्या देशातील महिला क्रिकेटपटूशी लग्न करून तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहितने विश्वचषक खेळू नये, तो बेशुद्ध पडेल; माजी भारतीय क्रिकेटरनेच ‘हिटमॅन’ला हिणवले!
टीम इंडियापासून वेगळे होताच राहुल द्रविडला मिळाली मोठी जबाबदारी, आता या भूमिकेत दिसणार
जेव्हा सहकारी खेळाडूंच्या तक्रारीवरून सूर्याला सोडावं लागलं होतं कर्णधारपद, मुंबई रणजी संघात झाला होता मोठा राडा!