---Advertisement---

सातत्याने खेळपट्टीवर टीका करणाऱ्या माजी कर्णधाराचा यू-टर्न, आता म्हणतोय “गेल्या काही सामन्यांपेक्षा…”

---Advertisement---

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या मालिकेत खेळपट्टीमुळे अनेक वाद रंगले आहेत. तसेच अनेक दिग्गजांनी टीका केल्याचे ही पाहायला मिळाले आहे. अशातच चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र इंग्लंडच्या फलंदाजांनी सुरुवातीलाच अतिशय खराब कामगिरी केली. हे पाहून मागील सामन्यात खेळपट्टी बाबत टीका करणाऱ्या माजी इंग्लिश कर्णधाराने या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांना चांगलेच फटकारले आहे.

इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय भारतीय गोलंदाजांनी चुकीचा ठरवत इंग्लंड संघाच्या फलंदाजांना नियमित कालांतराने माघारी धाडले. अशातच इंग्लंड संघाचा माजी कर्णधार माइकल वॉन याने तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळपट्टीवर टीका करत खेळपट्टी बरोबर नसल्याचे वक्तव्य केले होते. तसेच चौथ्या कसोटीआधीही वॉन यांनी खेळपट्टीबद्दल बरेच वादग्रस्त पोस्ट केल्या होत्या. ज्यावर ते ट्रोलही झाले होते. मात्र आता त्यांनी यू-टर्न घेत चौथ्या कसोटीसाठीची खेळपट्टी चांगली असल्याचे म्हणत इंग्लंडच्या फलंदाजीवर टीका केली आहे.

चौथ्या सामन्यात खेळपट्टी बरोबर आहे – माइकल वॉन

चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी माइकल वॉन यांनी ट्विट करत म्हटले की, “चौथ्या सामन्यासाठी बनवण्यात आलेली खेळपट्टी पूर्णपणे योग्य आहे.” त्यांनतर इंग्लंडच्या फलंदाजांना फटकारत त्याने लिहिले,” इंग्लंड संघाची फलंदाजी गेल्या काही सामन्यांपेक्षा खूपच खराब आहे. या खेळपट्टीवर पहिल्या डावात चांगल्या धावा उभारता येऊ शकतात. कारण ही खेळपट्टी धावा करण्यासाठी योग्य आहे. इकडे चेंडू फिरत नाहीये, सरळ बॅटवर येत आहे.”

पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व 

या सामन्यात पहिल्या दिवसाखेर भारताने पहिल्या डावात १२ षटकात १ बाद २४ धावा केल्या आहे. पहिल्या दिवसाखेर रोहित शर्मा ८ धावांवर आणि चेतेश्वर पुजारा १५ धावांवर नाबाद आहेत.

त्यापूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडला पहिल्या डावात ७५.५ षटकात सर्वबाद २०५ धावाच करता आल्या आहेत. इंग्लंडकडून या डावात बेन स्टोक्सने सर्वाधिक ५५ धावा केल्या. तसेच डॅनियल लॉरेन्सने ४६ धावांची खेळी केली. अन्य कोणत्याही फलंदाजाला ३० धावांचा टप्पा पार करता आला नाही.

भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर आर अश्विनने ३ विकेट्स, मोहम्मद सिराजने २ आणि वॉशिंग्टन सुंदरने १ विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या –

मैदानात आक्रमक खेळी आणि मैदानाबाहेर रोमँटिक; ग्लेन मॅक्सवेल सोशल मीडियावर होतोय ट्रेंड

सुमित नागलने नोंदवला कारकिर्दीतील सर्वोत्तम विजय, अर्जेंटीना ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक

सिराजच्या ‘त्या’ सेलिब्रेशनमध्ये ‘हा’ खेळाडू कायमच असतो साथीला, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---