---Advertisement---

‘बटलर शो’नंतर गोलंदाजांच्या जोरावर इंग्लंडचा शानदार विजय; न्यूझीलंडच्या खात्यात पहिली हार

On: मंगळवार, नोव्हेंबर 1, 2022 5:05 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात मंगळवारी (1 नोव्हेंबर) इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना खेळला गेला. उपांत्य फेरीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, इंग्लंडने अखेरच्या पाच षटकात शानदार गोलंदाजी करत सामना 20 धावांनी खिशात घातला. यासह इंग्लंडने उपांत्य फेरीसाठीच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या.

 

अ गटातील या सामन्यात पाच गुणांसह गुणतालिकेत अव्वलस्थानी असलेल्या न्यूझीलंड संघाने या सामन्यात नाणेफेक गमावली. इंग्लंडने आपला फलंदाजीचा निर्णय या सामन्यात सार्थ ठरवला. कर्णधार जोस बटलर व ऍलेक्स हेल्स या स्पर्धेतील दोन सामन्यात अपयशी ठरलेल्या सलामी जोडीने या सामन्यात तुफान फटकेबाजी केली.‌ त्यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत 10.2 षटकात 81 धावांची भागीदारी केली. हेल्सने 40 चेंडूवर 7 चौकार व एका षटकाराच्या मदतीने 51 तर, बटलरने 47 चेंडूवर 73 धावा तडकावल्या. त्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोनच्या 20 धावा वगळता इतर कोणत्याही फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता झाली नाही. इंग्लंडने निर्धारित 20 षटकात 6 बाद 179 अशी मोठी धावसंख्या रचली. न्यूझीलंडसाठी लॉकी फर्ग्युसनने दोन बळी मिळवले.

या भल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडला कॉनवेच्या रूपाने पहिला धक्का बसला. फिन ऍलन व केन विलियम्सन यांना धावांची अपेक्षित गती राखता आली नाही. ऍलन बाद झाल्यानंतर मागील सामन्याचा शतकवीर ग्लेन फिलिप्सने आक्रमक अंदाजात सुरुवात केली. दुसरीकडे विलियम्सन एकेरी दुहेरी धावांवर डाव पुढे नेत राहिला. त्याने 40 चेंडूंवर 40 धावा केल्या. दरम्यान फिलिप्सने आपले सलग दुसरे अर्धशतक पूर्ण केले.

अखेरच्या 5 षटकात 57 धावांची गरज असताना आधी वूडने तीन धावा व मिचेलचा बळी तर वोक्सने 5 धावा देत निशामला बाद करत इंग्लंडला सामन्यात पुढे केले. आणखी वेगाने धावा करण्याच्या प्रयत्नात फिलिप्स बाद झाला व न्यूझीलंडच्या आशांना सुरुंग लागला. त्याने ‌‌36 चेंडूवर 62 धावांची वादळी खेळी केली. शेवटी न्यूझीलंडचा डाव 6 बाद 159 धावांवर मर्यादित राहिला. बटलरला त्याच्या शानदार फलंदाजीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
खास रे! भल्याभल्यांना न जमलेली कामगिरी श्रीलंकेच्या सिंहांनी करून दाखवलीय
अरे काय हे, बांगलादेशविरुद्धही राहुलच करणार ओपनिंग! हेड कोच द्रविडने सांगितले त्यामागचे कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---