वनडे विश्वचषक 2023 मध्ये शनिवारी (11 नोव्हेंबर) इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात इंग्लंड संघाने वर्चस्व गाजवले. फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारल्यानंतर गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीने संघाने 93 धावांनी विजय मिळवला. यासह इंग्लंडने स्पर्धेचा समारोप विजयाने केला. या विजयासोबतच इंग्लंड संघ 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी पात्र ठरला.
England had something to cheer about at the end of their disappointing #CWC23 campaign 👌#ENGvPAK pic.twitter.com/S0usn40U2F
— ICC (@ICC) November 11, 2023
या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. जॉनी बेअरस्टो व डेव्हिड मलान यांनी अर्धशतकी भागीदारी करत चांगली सुरुवात केली. बेअरस्टो याने 59 धावांची खेळी केली. तिसऱ्या गड्यासाठी बेन स्टोक्स व जो रूट ही जोडी जमली व त्यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. स्टोक्सने सलग तिसऱ्या सामन्यांमध्ये 50 पेक्षा जास्त धावा करत 76 चेंडू 84 धावांची खेळी केली. तर, रूटने 60 धावा केल्या. अखेरच्या षटकांमध्ये बटलर व डेव्हिड विली यांनी काही मोठे फटके खेळत संघाला 337 पर्यंत पोहोचवले.
या धावांचा पाठलाग करताना दिली याने पाकिस्तानला दुसऱ्या चेंडूवर धक्का दिला. शफीकला बाद केल्यानंतर तिसऱ्या षटकात त्याने फखर झमान याला देखील तंबूचा रस्ता दाखवला. तिसऱ्या गड्यासाठी बाबर आझम व मोहम्मद रिझवान यांनी भागीदारी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते देखील फार काळ मैदानावर टिकू शकले नाहीत. त्यानंतर आगा सलमान याने अर्धशतक करत संघासाठी थोडीशी झुंज दिली. हारिस रौफ व मोहम्मद वसिम यांनी अर्धशतकी भागीदारी करून इंग्लंडचा विजय लांबवला. वोक्सने रौफला बाद करत पाकिस्तानचा डाव संपवला. अखेरचा सामना खेळणारे डेव्हिड विली याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
(England Beat Pakistan In ODI World Cup Qualify For 2025 Champions Trophy)
महत्वाच्या बातम्या –
रूटने रचला इतिहास! ईडन गार्डन्सवर पार केला इंग्लंड क्रिकेटमधील मैलाचा दगड
मार्शच्या नाबाद 177 धावांत बांगलादेशची धूळधाण! दणदणीत विजयासह ऑस्ट्रेलियाचा पुण्यात पराक्रम