वनडे विश्वचषक 2023 मध्ये शनिवारी (11 नोव्हेंबर) इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर हा सामना पार पडला. साखळी फिरतील आपला अखेरचा सामना जिंकून स्पर्धेचा विजयी निरोप घेण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक होते. यामध्ये इंग्लंडने 93 धावांनी मोठा विजय मिळवत स्पर्धेची विजयी सांगता केली. आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळत असलेला इंग्लंडचा अष्टपैलू डेव्हिड विली यालाच सामनावीर पुरस्कार देत गौरवण्यात आले.
David Willey won the @aramco #POTM in his last England appearance 🎉#CWC23 | #ENGvPAK pic.twitter.com/bNQ8Nne3Rr
— ICC (@ICC) November 11, 2023
या स्पर्धेच्या दरम्यान विली याने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. वयाच्या केवळ 33 व्या वर्षी त्याने घेतलेल्या या निर्णयाने सर्वजण चकित झाले होते. केंद्रीय करारात स्थान न मिळल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे त्याने म्हटलेले. त्यामुळे त्याच्यासाठी हा अखेरचा सामना ठरणार होता. त्याने या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करताना पाकिस्तानचे दोन्ही सलामीवीर पहिल्या दोन षटकात माघारी पाठवले. त्यानंतर पाकिस्तानसाठी सर्वाधिक धावा केलेल्या आगा सलमान याला देखील त्यानेच बाद केले. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
आपला तिसरा बळी घेताना त्याने वनडे क्रिकेटमध्ये आपले 100 बळी पूर्ण केले. इंग्लंडकडून वनडे क्रिकेटमध्ये 100 बळी मिळवणारा तो पहिला डावखुरा वेगवान गोलंदाज ठरला. त्याने या विश्वचषकात इंग्लंडसाठी वेगवान गोलंदाजांमध्ये सर्वाधिक 11 बळी देखील घेतले.
त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर नजर टाकल्यास दिसून येते की त्याने इंग्लंडसाठी 73 सामन्यांमध्ये 663 धावा व 100 बळी मिळवले आहे. तर, टी20 क्रिकेटमध्ये त्याने 43 सामन्यात 51 बळी मिळवले. त्याला इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही.
(David Willy Won Man Of The Match In His Last International Cricket Match)
महत्वाच्या बातम्या –
रूटने रचला इतिहास! ईडन गार्डन्सवर पार केला इंग्लंड क्रिकेटमधील मैलाचा दगड
मार्शच्या नाबाद 177 धावांत बांगलादेशची धूळधाण! दणदणीत विजयासह ऑस्ट्रेलियाचा पुण्यात पराक्रम