---Advertisement---

सराव सामन्यात इंग्लंडने पाकचा उडवला धुव्वा! युवा इंग्लिश फलंदाजांनी केली षटकार-चौकारांची बरसात

On: सोमवार, ऑक्टोबर 17, 2022 6:11 PM
---Advertisement---

टी20 विश्वचषकाची मुख्य फेरी सुरू होण्यासाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. तत्पूर्वी, आधीच मुख्य फेरीत स्थान मिळवलेल्या संघांना प्रत्येकी दोन सराव सामने खेळावयास मिळणार आहेत. पाकिस्तानने आपला पहिला सराव सामना सोमवारी (17 ऑक्टोबर) इंग्लंडविरुद्ध खेळला. इंग्लंडने या सामन्यात जबरदस्त खेळ करत पाकिस्तानला सहा गड्यांनी नमवले.

ब्रिस्बेन येथील गाबा मैदानावर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने प्रथम नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळत असलेल्या पाकिस्तानसाठी शान मसूदने सलामीला येत 22 चेंडूंवर आक्रमक 39 धावा केल्या. संघाच्या इतर फलंदाजांना सुरुवात मिळाली मात्र ते मोठ्या धावा करू शकले नाहीत. मोहम्मद वसीम ज्युनिअर याने अखेरीस 16 चेंडूंवर 26 धावा करून संघाला 19 षटकात 160 धावांपर्यंत मजल मारून दिली.

संघाचा नियमित कर्णधार जोस बटलर याच्या अनुपस्थितीत मैदानात उतरलेल्या पाकिस्तानला दोन झटके लवकर बसले. मात्र, अष्टपैलू बेन स्टोक्स याने 18 चेंडूंवर 36 आणि लियाम लिव्हिंगस्टोनने 16 चेंडूंवर 28 धावा करत संघाला पुढे नेले. ते दोघे बाद झाल्यानंतर हॅरी ब्रुक व सेम करन ही जोडी जमली. त्यांनी पाकिस्तानी गोलंदाजीचा अक्षरशा खरपूस समाचार घेतला. ब्रुकने 24 चेंडूंवर नाबाद 45 तर करनने 14 चेंडूवर 33 धावांचा तडाखा देत संघाला विजयी लक्ष केवळ 14.4 षटकात गाठून दिले.

या सामन्यासाठी पाकिस्तानने आपले प्रमुख खेळाडू बाबर आझम व मोहम्मद रिझवान यांना विश्रांती दिली. तर इंग्लंड संघातही जोस बटलर व मोईन अली यांचा समावेश नव्हता. पाकिस्तानचा प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याने या सामन्यातून पुनरागमन केले. दोन षटके टाकताना त्याने केवळ 7 धावा खर्च केल्या. ‌पाकिस्तान आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात भारताविरुद्ध 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न येथे करेल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अर्रर्र, आता कसं होणार! कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध भिडण्यापूर्वीच रिषभ पंत जखमी? फोटो व्हायरल
पीएमडीटीए सोलिंको ओम दळवी मेमोरीयल टेनिस स्पर्धेत ऋषभ, ओवी मारणे, रेयांश गुंड यांना विजेतेपद 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---