वेस्ट इंडिज आणि इंग्लंड (West Indies vs England) या दोन्ही संघांमध्ये सध्या ५ टी२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा टी२० सामना रविवारी (२३ जानेवारी ) पार पडला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात इंग्लंड संघाने बाजी मारली आणि १ धावांनी हा सामना आपल्या नावावर केला. या विजयासह ही मालिका १-१ च्या बरोबरीत आली आहे.
या सामन्यात वेस्ट इंडिज संघाला (West Indies) विजयासाठी १७२ धावांची आवश्यकता होती. या धावांचा पाठलाग करताना शेवटच्या षटकात वेस्ट इंडिज संघाला विजयासाठी ३० धावांची आवश्यकता होती. त्यावेळी वेस्ट इंडिज संघाकडून अकील हुसेन (Akeal Hossain) आणि रोमरियो शेफर्ड (Romario Shepheard) यांची जोडी मैदानावर होती. इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गनने (Eoin Morgan) शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी साकिब महमूदला दिली होती.
साकिब महमूदने या षटकात दोन अतिरिक्त धावा दिल्या. तसेच अकील हुसेनने या षटकात तीन गगनचुंबी षटकार आणि २ खणखणीत चौकार मारले. चौकार आणि षटकारांचा साहाय्याने त्याने २६ धावा जोडल्या. तरीदेखील वेस्ट इंडिज संघाला या सामन्यात १ धावाने पराभवाचा सामना करावा लागला आहे.
1Wd . 4 4 1 1Wd 6 6 6
What a finish! 🤯
West Indies almost pulled off another miraculous final-over win against England, only to fall short by a run!#WIvENG pic.twitter.com/TMZyYesytH
— ICC (@ICC) January 24, 2022
इंग्लंडने केल्या होत्या १७१ धावा
या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकून इंग्लंड संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. इंग्लंड संघाकडून प्रथम फलंदाजी करताना जेसन रॉयने सर्वाधिक ४५ धावांची खेळी केली. तर मोईन अलीने ३१ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर इंग्लंड संघाला २० षटक अखेर ८ बाद १७१ धावा करण्यात यश आले होते.
या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाकडून अकील हुसेनने अवघ्या १६ चेंडूंमध्ये नाबाद ४४ धावांची खेळी केली. तर रोमारियो शेफर्डने देखील नाबाद ४४ धावांची खेळी केली. वेस्ट इंडिज संघाने हा सामना १ धावाने गमावला.
महत्वाच्या बातम्या :
दणदणीत मालिका विजयानंतर दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू म्हणतोय ‘जय श्रीराम’; वाचा संपूर्ण प्रकरण
वाढदिवस विशेष: टीम इंडियाची माॅडर्न एराची भिंत, चेतेश्वर पुजारा!
हे नक्की पाहा: