सध्या युएईत आशिया चषक 2022 चा थरार सुरू आहे. आशिया चषकानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी20 विश्वचषक 2022 खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या आयसीसी स्पर्धेसाठी शुक्रवारी (02 सप्टेंबर) इंग्लंड क्रिकेट बोर्डाने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. सध्या खराब फॉर्मशी झुंज देत असलेल्या जेसन रॉय याला टी20 विश्वचषकासाठी संघात जागा दिली गेली नाहीये. तर फिल साल्ट या नव्या चेहऱ्याची निवड करण्यात आली आहे.
जोस बटलर याच्याकडे इंग्लंडच्या संघाचे नेतृत्त्वपद देण्यात आले आहे. ओएन मॉर्गनच्या निवृत्तीनंतर त्याच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती.
इंग्लंडच्या टी20 संघाचा 32 वर्षीय फलंदाज रॉय याच्यावर त्याच्या खराब फॉर्ममुळे टी20 विश्वचषकातून दुर्लक्ष करण्यात आले आहे. गतवर्षीच्या टी20 विश्वचषकानंतर त्याने 11 सामने खेळताना केवळ 18.72 च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. त्याने 11 सामन्यात फक्त 206 धावा केल्या आहेत. याचमुळे त्याला विश्वचषकातून वगळण्यात आले आहे.
दुसरीकडे फिल साल्टला त्याला देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा, द हंड्रेडमधील प्रदर्शनामुळे निवडण्यात आले आहे. 26 वर्षीय साल्टने जानेवारी 2022 मध्येच वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
इंग्लंडचा टी20 विश्वचषक संघ:
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, रीस टोपले, डेविड विली, ख्रिस वोक्स आणि मार्क वुड.
स्टँडबाय- टायमल मिल्स, लियाम डॉसन आणि रिचर्ड ग्लीसन
Squad ???? #T20WorldCup ???? ???? ???? pic.twitter.com/k539Gzd5Ka
— England Cricket (@englandcricket) September 2, 2022
याबरोबरच टी20 विश्वचषकापूर्वी इंग्लंडला पाकिस्तान दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यात उभय संघ 7 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहेत. या मालिकेसाठीही इंग्लंड बोर्डाने 19 सदस्यीय संघ घोषित केला आहे. या संघात टी20 विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या बहुतेक खेळाडूंना सहभागी करण्यात आले आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी इंग्लंडचा संघ:
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, हॅरी ब्रूक, जॉर्डन कॉक्स, सॅम करन, बेन डकेट, लियाम डॉसन, रिचर्ड ग्लीसन, टॉम हेल्म, विल, जॅक्स, डेविड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, ऑली स्टोन, रीस टोपले, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, ल्यूक वुड आणि मार्क वुड.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
बांगलादेशला सळो की पळो करणाऱ्या कुसल मेंडिसचा खास ‘ऍक्शन प्लॅन’! स्वत: केलायं खुलासा
हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघ गाफील! सराव सत्र रद्द करून खेळाडू करतायेत…
एक पराभव पाकिस्तानला दाखवेल घरचा रस्ता, हाँगकाँगविरुद्ध ‘या’ 11 खेळाडूंसह उतरेल आझम






