---Advertisement---

ENGvsNZ: कसोटी मालिका तोंडावर असताना इंग्लंडला मोठा धक्का, कर्णधार सराव सत्रात दुखापतग्रस्त

---Advertisement---

बुधवारपासून (०३ जून) न्यूझीलंडच्या इंग्लंड दौऱ्यास प्रारंभ होत आहे. या दौऱ्यावर उभय संघांना २ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेपुर्वी यजमान इंग्लंड संघाच्या खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली आहे. परंतु सराव सत्रातून त्यांच्यासाठी वाईट बातमी पुढे आली आहे. इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार जो रुट याला सराव करत असताना दुखापत झाली आहे. त्यामुळे तो बुधवारी लॉर्ड्स येथे होणाऱ्या पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे.

सोमवार रोजी इंग्लंड संघ सरावासाठी मैदानावर उतरला होता. यावेळी संघ प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवुड हे थ्रो डाउनचा सराव करुन घेत होते. यादरम्यान रुटच्या उजव्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर त्याने त्वरित मैदान सोडले आणि सहाय्यक प्रशिक्षक पॉल कॉलिंगवुड यांच्यासह उपचार करण्यासाठी निघून गेला. पुढे काही वेळानंतर तो सराव सत्रात परतला. परंतु सरावासाठी मैदानावर उतरला नाही.

असे म्हटले जात आहे की, डॉग थ्रोअर या प्रशिक्षण उपकरणाद्वारे टाकल्या गेलेल्या चेंडूवर रुट जखमी झाला होता. त्या उपकरणातून आलेला चेंडू जोराने रुटच्या उजव्या हातावर आदळला. यामुळे तो जखमी झाला.

इंग्लंडच्या संघ व्यवस्थापनाने रुटच्या दुखापतीविषयी माहिती देताना सांगितले की, “रुटला खबरदारीचा उपाय म्हणून पहिल्या कसोटी सामन्यापुर्वी मंगळवारच्या अभ्यास सत्रात सहभागी केले जाणार नाही. असे असले तरीही, तो पहिल्या सामन्यासाठी अनुपस्थित राहण्याची शक्यता फार कमी आहे. जर रुट दुखापतीमुळे हा सामना खेळू शकला नाही, तर त्याच्याजागी सॅम बिलिंग्स संघाचे नेतृत्त्व करेल.”

रुट हा इंग्लंड कसोटी संघाचा सर्वात विश्वासू फलंदाज आहे. त्याने २०२१ मध्ये आतापर्यंत ६ कसोटी सामने खेळताना तब्बल ७९४ धावा चोपल्या आहेत. ३ शतकांच्या मदतीने त्याने ही धावसंख्या उभारली आहे. दरम्यान २२८ धावा ही त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी राहिली आहे. अशात रुट बलाढ्य न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला मुकल्यास इंग्लंड संघ संघर्ष करताना दिसू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-

मोहित शर्मा, राहुल तेवतिया यांनी १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूला इंग्लंड दौऱ्यासाठी दिला खास ‘गुरुमंत्र’

भल्या- भल्या फलंदाजांच्या दांड्या गुल करणाऱ्या मोहम्मद शमीचे निवृत्तीवर मोठे भाष्य; पाहा काय म्हणतोय

नेतृत्वबदलाची पुनरावृत्ती! असगर अफगाणला पुन्हा काढले कर्णधारपदावरुन, ‘या’ खेळाडूकडे सोपवली नेतृत्वाची जबाबदारी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---