---Advertisement---

भल्या- भल्या फलंदाजांच्या दांड्या गुल करणाऱ्या मोहम्मद शमीचे निवृत्तीवर मोठे भाष्य; पाहा काय म्हणतोय

Mohammed Shami
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम साउथॅम्प्टनमध्ये सामना खेळला जाणार आहे. या सामन्यानंतर भारतीय संघाला इंग्लंड संघाविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान दुखापतग्रस्त झालेला गोलंदाज मोहम्मद शमी अगामी इंग्लंड दौऱ्यातून भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. अशातच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याबाबतही मोठे वक्तव्य केले आहे.

भारतीय संघात मोहम्मद शमीचे आगमन झाल्याने भारतीय संघाची वेगवान गोलंदाजी आणि धारदार होणार आहे. अशातच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या प्रश्नावर उत्तर देत म्हटले की, “आमच्या गोलंदाजी आक्रमणाचे वैशिष्ट्य म्हणजे, आमच्या संघात असे ४ ते ५ गोलंदाज आहेत. जे सतत १४० ते १४५ च्या गतीने गोलंदाजी करू शकतात. तुम्ही एक किंवा दोन गोलंदाजांना शोधून काढू शकता. परंतु , ४-५ गोलंदाजांना शोधून काढणे कठीण असते आणि आमच्याकडे ते आहेत. आम्ही विरोधी संघाला विचार करण्यास भाग पाडू शकतो की, आमच्या संघाविरुद्ध त्यांची रणनीती काय असेल.”

तसेच तो पुढे म्हणाला की, “एक वरिष्ठ खेळाडू म्हणून हे आमचे कर्तव्य आहे की, आम्ही युवकांना मुक्तपणे गोलंदाजी करण्यास सांगावे. तसं तर आमच्या संघात युवा आणि वरिष्ठ खेळाडूंमध्ये समन्वय खूप चांगला आहे. ही एक गोष्ट आहे की, आपल्या सर्वांना एक ना दिवस निवृत्ती घ्यायची आहे. यात मुख्य बाब ही आहे की, तुम्ही संघासाठी आणि युवा खेळाडूंसाठी जाताना मागे काय सोडून जात आहात. हे ही महत्वाचे आहे की, जाताना आपण आपला देश, कर्णधार आणि बोर्ड यांना अभिमान वाटायला हवा.”

अगामी इंग्लंड दौऱ्यात मोहम्मद शमी,जसप्रीत बुमराह आणि ईशांत शर्मा या तीनही वेगवान गोलंदाजांवर भारतीय संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

“जे उपलब्ध नसेतील त्यांच्यासाठी ही आयपीएल थांबवली जाणार नाही”

नेतृत्वबदलाची पुनरावृत्ती! असगर अफगाणला पुन्हा काढले कर्णधारपदावरुन, ‘या’ खेळाडूकडे सोपवली नेतृत्वाची जबाबदारी

बीसीसीआयच्या चिंतेत वाढ! इंग्लंडपाठोपाठ ‘या’ देशातील खेळाडूही राहणार उर्वरित आयपीएल २०२१ साठी अनुपलब्ध

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---