भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याला अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये सुरुवात झाली. या सामन्यात देखील आर. अश्विन आणि अक्षर पटेल कडून भारतीय संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात आर. अश्विनने एकूण ९ गडी बाद केले होते. तर दुसऱ्या सामन्यात त्याला ८ गडी बाद करण्यात यश आले होते. यासोबतच त्याने दुसऱ्या डावात शतक देखील झळकावले होते.
त्याच्या या प्रदर्शनाने इंग्लिश कर्णधार जो रूट देखील प्रभावित झाला होता. तिसरा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी इंग्लंड संघाच्या कर्णधाराने आर. अश्विनवर स्तुतीसुमने उधळली. त्याने अश्विनच्या खेळाचे यावेळी भरभरून कौतुक केले.
तिसरा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी पहिल्या सामन्यात सामनावीर ठरलेल्या जो रूटने दुसऱ्या सामन्यातील सामनावीर आर.अश्विन बद्दल म्हंटले आहे की, “तो (अश्विन) एक विश्वस्तरीय खेळाडू आहे. मला वाटते की सर्वांना त्याच्या गोलंदाजी विरुद्ध खेळणे सोपे नसेल. मुख्यतः उजव्या हाताच्या फलंदाजांना त्याच्याविरुद्ध खेळताना कठीण आहे. विश्व क्रिकेटमध्ये उजव्या हाताच्या फलंदाजांविरुद्ध त्याचा विक्रम खूप चांगला आहे.”
अश्विनने पहिल्या २ कसोटी सामन्यात भारतीय संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने पहिल्या कसोटी सामन्यात ९ तर दुसऱ्या कसोटी सामन्यात ८ गडी बाद केले आहेत. तसेच एक शतक देखील झळकावले आहे. जो रूटने अश्र्विनच्या शतकी खेळीबद्दल म्हंटले की, “त्याने लीचला गोलंदाजी करतांना असंतुलित केले होते. त्याने लीचला योग्य लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करूच दिली नाही.” तसेच रुटने युवा रिषभ पंतचे देखील कौतुक केले आणि म्हणाला की, तो एक कौशल्यवान खेळाडू आहे. परंतु तो विरोधी संघाला संधी देतो. तसेच त्याने यावेळी नव्याने बांधल्या गेलेल्या मोटेरा स्टेडियमचे देखील कौतुक केले.
महत्वाच्या बातम्या:
INDvsENG 3rd Test Live: भारताला दुहेरी झटका, शुबमन गिल-चेतेश्वर पुजारा स्वस्तात माघारी
भारतीय महिला संघ मैदानावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज; या संघाविरुद्ध मायदेशात खेळणार मालिका
शंभरावा सामना खेळणाऱ्या इशांत शर्माचे टीम इंडियाने असे केले मैदानात स्वागत, पाहा व्हिडिओ