ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेत दोन्ही संघांमध्ये 5 एकदिवसीय सामने खेळले जातील. मात्र या एकदिवसीय मालिकेपूर्वी इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.
नियमित कर्णधार जोस बटलर उजव्या पायाच्या दुखापतीमुळे वनडे मालिकेतून बाहेर पडला. बटलरच्या अनुपस्थितीत, यॉर्कशायरचा उजवा हाताचा फलंदाज हॅरी ब्रूक प्रथमच एकदिवसीय संघाचं नेतृत्व करेल. दुसरीकडे, लेस्टरशायरचा जोश हलही दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्याजागी लँकेशायरचा अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोनला वनडे संघात स्थान मिळालं.
लिव्हिंगस्टोनला टी20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याचं बक्षीस मिळालं. त्यानं दुसऱ्या टी20 सामन्यात 5 विकेट घेतल्या होत्या. याशिवाय त्यानं 47 चेंडूत 87 धावा केल्या होत्या. 25 वर्षीय हॅरी ब्रुकनं इंग्लंडसाठी केवळ 15 एकदिवसीय सामने खेळले आहेत. संघात अन्य वरिष्ठ खेळाडू उपस्थित आहेत. मात्र इंग्लंड क्रिकेट बोर्डानं या महत्त्वाच्या मालिकेसाठी युवा हॅरी ब्रुकवर विश्वास दाखवला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंडचा संघ – हॅरी ब्रूक (कर्णधार), जोफ्रा आर्चर, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जॉर्डन कॉक्स, बेन डकेट, विल जॅक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, मॅथ्यू पॉट्स, आदिल रशीद, फिल सॉल्ट, जेमी स्मिथ, ऑली स्टोन, रीस टोपली, जॉन टर्नर
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
पहिला वनडे – गुरुवार 19 सप्टेंबर, ट्रेंट ब्रिज,
दुसरा वनडे – शनिवार 21 सप्टेंबर, हेडिंग्ले
तिसरा वनडे – मंगळवार 24 सप्टेंबर, सीट युनिक रिव्हरसाइड
चौथा वनडे – शुक्रवार 27 सप्टेंबर, लॉर्ड्स
पाचवा वनडे – रविवार 29 सप्टेंबर, सीट युनिक स्टेडियम
हेही वाचा –
गेल्या वेळी अनसोल्ड राहिले, आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात या खेळाडूंवर होईल पैशांचा वर्षाव
रोहित शर्माने मुंबई इंडियन्स सोडावी का? माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य
श्रेयस अय्यरच्या संघाचा सलग दुसरा पराभव, आयपीएल विजेता कर्णधार फलंदाजीतही फ्लॉप!