---Advertisement---

‘आमच्या संघाची सर्वात मोठी ताकद म्हणजे…’, टी२० विश्वचषकापूर्वी इंग्लिश कर्णधाराचे वक्तव्य

On: शुक्रवार, ऑगस्ट 20, 2021 11:52 PM
---Advertisement---

यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी काही दिवसच शिल्लक आहेत. अशात प्रत्येक संघ या स्पर्धेच्या तयारीला लागलेला आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघाने तर त्यांचा १५ सदस्यीय संघ देखील जाहीर केला आहे. अनेक दिग्गजांकडून या स्पर्धेसाठी भारत आणि इंग्लंड या दोन संघांना ही स्पर्धा जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानले जात आहे.

गेल्या काही काळापासून मर्यादित षटकांमध्ये इंग्लंडने चांगली कामगिरी केली आहे. इंग्लंडचा मर्यादित षटकांचा कर्णधार ओएन मॉर्गनने त्याच्या संघाच्या सातत्यपूर्ण कामगिरीला याचे श्रेय दिले. मॉर्गनच्या मते इंग्लंडची सातत्यपूर्ण कामगिरी ही त्यांची सर्वात मोठी ताकद आहे. इंग्लंडचा संघ सातत्याने चांगले खेळण्याचा करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच होणाऱ्या चुकांमधून देखील शिकण्याचा प्रयत्न करत आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) सोबत बोलताना मॉर्गन म्हणाला, “माझ्यामते आमच्या संघाची सर्वात मोठी ताकत ही आमची सातत्यपूर्ण कामगिरी आहे. ज्यामुळे आम्ही मागील दोन वर्षांपासून खेळत आहोत. मला वाटते की ती टी-२० च्या प्रकारात खेळ कधीही बदलू शकतो. तसेच विश्वचषक स्पर्धेसाठीच्या आमच्या गटात खूप मजबूत संघांचा समावेश आहे. त्यामुळे मला वाटते की, आमच्यासाठी या स्पर्धेतील प्रत्येक सामना महत्त्वाचा असणार आहे. आम्ही चांगली लय प्राप्त करत आहोत. यामुळे आम्ही सतत आमच्यात सुधारणा करत आहोत. आणि आणखीन शिकण्याचा प्रयत्न करत आहोत.”

दरम्यान, टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन भारतात होणार होते. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयसीसीने ही स्पर्धा यूएईला करण्याचे ठरवले. इंग्लंडने २०१५ पासून यूएईमध्ये एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे इंग्लंड संघाला आपली लय कायम ठेवण्यासाठी युएईच्या मैदानावर चांगली मेहनत घ्यावी लागणार आहे.

तसेच आयसीसीने मंगळवारी (१७ ऑगस्ट) टी-२० विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक देखील जाहीर केले होते. याआधीच आयसीसीने स्पर्धेचे गट देखील तयार केले होते. ज्यात ‘अ’ गटात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज संघाचा समावेश करण्यात आला आहे. तर ‘ब’ गटामध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्थान संघांचा समावेश आहे.

इंग्लंडचा संघ मागील टी-२० स्पर्धेचा उपविजेता आहे. ज्यात वेस्ट इंडीज संघाने इंग्लंडला नमवत दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकाच्या किताबावर आपले नाव कोरले होते. तसेच यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्या सामन्यात २३ ऑक्टोबरला पुन्हा हे दोन संघ एकमेकांना भिडणार आहेत.

महत्वाच्या बातम्या –
–तयारी टी२० विश्वचषकाची! बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी केली कर्णधार विराट कोहलीसह महत्त्वपूर्ण चर्चा
–“त्यांच्या आई-वडिलांनी देखील असा विचार केला नसेल”, माजी इंग्लिश कर्णधाराने शमी, बुमराहचे केले तोंडभरून कौतुक
–शमी-बुमराहच्या ग्रँड वेलकमची प्लॅनिंग नक्की कोणी केली होती? आर अश्विनने केला खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---