कोलंबो। सोमवारी(26 नोव्हेंबर) इंग्लंड संघाने श्रीलंकेचा तिसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्याच दिवशी 42 धावांनी पराभव केला आणि तीन सामन्यांची कसोटी मालिका 3-0 ने जिंकत श्रीलंकेला व्हाइटवॉश दिला आहे.
त्यामुळे जवळजवळ 55 वर्षांनतर इंग्लंडच्या संघाला मायदेशाबाहेर 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत प्रतिस्पर्धी संघाला व्हाईटवॉश देता आला आहे. त्यांनी मायदेशाबाहेर 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत शेवटचा व्हाईटवॉश 1963 मध्ये न्यूझीलंडला दिला होता.
त्याआधी त्यांनी 1895/96 मध्ये दक्षिण आफ्रीकेविरुद्ध असा कारनामा केला होता.
त्याचबरोबर मात्र श्रीलंकेला लाजिरवाण्या पराभवाबरोबरच एका नकोशा विक्रमालाही सामोरे जावे लागले आहे. त्यांना मायदेशात कसोटी मालिकेत व्हाईटवॉश मिळण्याची ही तिसरी वेळ आहे.
याआधी त्यांना 2004 मध्ये आॅस्ट्रेलियाने 3-0, भारताने 2017 मध्ये 3-0 असा व्हाईटवॉश दिला आहे. त्यामुळे मागील दोन वर्षात त्यांनी दोन वेळा व्हाईटवॉश स्विकारला आहे.
त्याचबरोबर श्रीलंका दौऱ्यावर आलेल्या पाहुण्या संघाने तीन्ही प्रकारच्या क्रिकेट मालिकेत विजय मिळवण्याचीही ही तिसरी वेळ आहे. याआधी पाकिस्तानने 2015 मध्ये तर भारताने 2017 मध्ये असा कारनामा केला आहे. इंग्लंडने श्रीलंकेविरुद्ध वनडेमध्ये 3-1, तसेच एकमेव टी20 मध्ये विजय आणि आता कसोटीत 3-0 असा विजय मिळवला आहे.
या सामन्यात इंग्लंडने दुसऱ्या डावात 230 धावा करत पहिल्या डावातील 96 धावांच्या आघाडीसह श्रीलंकेला 327 धावांचे आव्हान दिले होते. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंका संघाला 284 धावाच करता आल्या.
महत्त्वाच्या बातम्या:
–आॅस्ट्रेलियाचा फक्त तो एकटाच खेळाडू म्हणतो, विराट एक्सप्रेस थांबवणारच
–मला पहिल्या सामन्यात फलंदाजांनी धू-धू धूलते तेव्हा हार्दिक हसत होता- कृणाल पंड्या
–अखेर स्मृती मंधानाने संघ बदलला, तर हरमनप्रीत कौरचा संघ मात्र कायम