---Advertisement---

टी20 वर्ल्ड कपच्या तोंडावर श्रीलंकेचा दारुण पराभव, इंग्लंडकडून क्लीन स्वीप

On: बुधवार, फेब्रुवारी 4, 2026 8:19 AM
---Advertisement---

T20 World Cup 2026 पूर्वी श्रीलंकेची तयारी चांगलीच कोलमडली असल्याचं चित्र दिसत आहे. इंग्लंडविरुद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत यजमान श्रीलंकेला 0-3 असा क्लीन स्वीप सहन करावा लागला. सह-यजमान असलेल्या श्रीलंकेसाठी ही मालिका म्हणजे वर्ल्ड कपपूर्व ड्रेस रिहर्सल होती, मात्र इंग्लंडने प्रत्येक सामन्यात वर्चस्व गाजवत श्रीलंकेच्या उणिवा उघड केल्या.

मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना पल्लेकेले येथे खेळवण्यात आला. इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र श्रीलंकेच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच दबाव टाकत इंग्लंडला नियमित धक्के दिले. संपूर्ण इंग्लंड संघ 20 षटकांत 9 गडी बाद 128 धावांपर्यंतच मजल मारू शकला. या डावात सॅम करनने जबाबदारीने खेळत 48 चेंडूत 58 धावांची खेळी केली. जोस बटलरने 25 तर लियाम डॉसनने 14 धावा केल्या. करनशिवाय अन्य फलंदाज अपयशी ठरले.

129 धावांच्या तुलनेने सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. संघ 19.3 षटकांत केवळ 116 धावांवर सर्वबाद झाला आणि सामना 12 धावांनी गमावला. कुसल मेंडिसने सर्वाधिक 26 धावा केल्या, तर पथुम निसंका (23), जनिथ लियानगे (17), कामिंदू मेंडिस (14) आणि पवन रथनायके (13) स्वस्तात बाद झाले. मात्र कोणालाही सामना जिंकून देणारी मोठी खेळी करता आली नाही.

इंग्लंडकडून गोलंदाजीत जेकब बेथेलने 4, तर विल जॅक्सने 3 बळी घेत श्रीलंकेची कंबर मोडली. संपूर्ण मालिकेत सॅम करनने सातत्यपूर्ण कामगिरी करत 79 धावा आणि 3 बळी घेतले. त्यामुळे त्याची ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ म्हणून निवड झाली.

या पराभवानंतर श्रीलंकेसमोर टी20 वर्ल्ड कप 2026पूर्वी आत्मपरीक्षणाचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. आता श्रीलंका थेट विश्वचषकात खेळणार असून, त्यांचा पहिला सामना 8 फेब्रुवारी रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या या निराशाजनक कामगिरीनंतर श्रीलंका कशी पुनरागमन करते, याकडे लक्ष लागलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---