भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा आणि अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत सध्या पहिल्या तीन सामन्यांनंतर भारतीय संघ २-१ ने पुढे आहे. त्यामुळे मालिकेतील पराभव टाळण्याच्या दृष्टीने इंग्लंडसाठी चौथा सामना महत्त्वाचा ठरणार आहे. त्यातच या सामन्याआधी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत.
इंग्लंड संघाचा माजी फलंदाज मार्कस ट्रेस्कॉथिकला राष्ट्रीय संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच जॉन लुइसला गोलंदाजी प्रशिक्षकाची आणि न्यूजीलंड संघाचा माजी क्रिकेटपटू जीतन पटेलला फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी देण्यात आली आहे. ख्रिस सिल्वरवुड हे या संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत.
तसेच येत्या १२ मार्चपासून टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. माहितीनुसार, इंग्लंड संघासाठी नियुक्त केले गेलेले हे नवीन प्रशिक्षक मार्च महिन्यापासूनच पद सांभाळणार आहेत. ट्रेस्कॉथिक हे जोनाथन ट्रॉटची जागा घेणार आहेत. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे कामगिरी मार्गदर्शक मो बोबाट यांनी म्हटले होते की, “मार्कस, जॉन आणि जीतन यांनी मोठ्या पातळीवर आपल्या क्षमतेचे प्रदर्शन केले आहे. यावरून दिसून येते की भविष्यात ते खूप काही करू शकतील.”
कसोटी मालिकेत भारतीय संघ आघाडीवर
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत सध्या भारतीय संघ २-१ ने पुढे आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंड संघाने २२७ धावांनी जिंकला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने चोख प्रत्युत्तर देत इंग्लंड संघाला ३१७ धावांनी पराभूत केले होते. त्यानंतर तिसरा सामना दिवस-रात्र झाला होता. २ दिवसातच संपलेल्या या दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारतीय संघाने १० गडी राखून विजय मिळवला होता. आता ४ मार्चपासून चौथा सामना अहमदाबादला सुरु होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
राहुल नाम तो सुना होगा ! त्याच्या एकट्यासाठी घेतली गेली होती भल्यामोठ्या स्टेडियमवर ट्रायल
इंस्टाग्रामवर १०० मिलियन फॉलोवर्स मिळवणारा पहिला क्रिकेटपटू बनला विराट, आयसीसीने केले खास ट्विट