---Advertisement---

आयपीएलमध्ये नाही दिसणार इंग्लिश खेळाडू?

On: शुक्रवार, जानेवारी 14, 2022 1:08 AM
BUTLLER STOKES
---Advertisement---

इंग्लंडचा कसोटी संघ (England test team) मागच्या काही काळापासून निराशाजनक प्रदर्शन करत आहे. सध्या खेळल्या जाणारी ऍशेस मालिकाही इंग्लंडच्या हातातून निसटली आहे. मागच्या वर्षी भारताच्या दौऱ्यात इंग्लंडला पराभव स्वीकारावा लागला होता, तसेच मायदेशातील भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत देखील त्यांचा संघ पिछाडीवर आहे. आता याच पार्श्वभूमीवर इंग्लंड क्रिकेट बोर्ड त्यांच्या खेळाडूंवर काही कडक निर्बंध लादू शकते. आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये इंग्लंडच्या खेळाडूंच्या सहभागाविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.

इंग्लंडचे वृत्तपत्र द टाइम्सच्या वृत्तानुसार, इंग्लंड क्रिकेट बोर्डला त्यांच्या संघाचे कसोटीतील प्रदर्शन सुधारण्यासाठी काही सल्ले मिळाले आहेत. आयपीएलमध्ये खेळाडूंच्या सहभागावर बंदी घालण्याचा सल्ला देखील त्यामध्ये सामील आहे. हा सल्ला इंग्लंड संघाचे मेनेजिंग डायरेक्टर एश्ले जाइल्सकडून इंग्लंड क्रिकेट बोर्डच्या कमिटीचे प्रमुख एंड्र्यू स्ट्रॉस यांना दिला गेला आहे. आगामी काळात होणाऱ्या सामन्यांसाठी इंग्लंड संघाचे खेळाडूंना चांगल्या प्रकारे सराव करता यावा, यासाठी ही मागणी केली गेली आहे.

२०२१ मध्ये इंग्लंडने मायदेशातील न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्यांच्या संघातील अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली होती. यादरम्यान काही खेळाडू आयपीएलमध्ये खेळताना दिसले होते. बोर्डने हा निर्णय खेळाडूंचा ताण कमी होण्यासाठी घेतला होता. परंतु, खेळाडू आयपीएलमध्ये खेळत होते. यादरम्यान इंग्लंडने कसोटी क्रिकेटमध्ये खूपच निराशाजनक प्रदर्शन केले, त्यांनी खेळलेल्या १५ कसोटी सामन्यांपैकी अवघे चार सामने जिंकले.

आयपीएलमध्ये खेळाडूंच्या सहभागावर बंदी आणण्याच्या बातम्या जरी समोर येत असल्या, तरी हा निर्णय बोर्डसाठी सोपा नसणार आहे. खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यासाठी चांगला मोबदला मिळतो, अशात बोर्डच्या या निर्णयानंतर त्यांचे नुकसान होणे निश्चित आहे. याच कारणास्तव खेळाडू या निर्णयाच्या विरोधात जाण्याची पूर्ण शक्यता आहे.

आयपीएल २०२२ मध्ये लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नवीन फ्रेंचायझी सामील होणार आहेत. दोन नवीन संघ सामील झाल्यामुळे खेळाडू आणि स्पर्धेतील सामने देखील वाढण्याची शक्यता आहे. आयपीएलचा पुढचा हंगाम एप्रिल महिन्याच्या शेवटी सुरू आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात संपण्याची शक्यता आहे. याच काळात इंग्लंडला न्यूझीलंडसोबत कसोटी मालिका देखील खेळायची आहे. सध्या इंग्लंडचे जॉनी बेयरस्टो, जोस बटलर, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, डेविड मलान आणि क्रिस वॉक्स हे खेळाडू आयपीएलमध्ये खेळतात. हे सर्व खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळले, तर इंग्लंडच्या अडचणी नक्कीच वाढतील.

महत्वाच्या बातम्या –

आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या वेळापत्रकात झाला बदल, जाणून घ्या कारण

केपटाऊन कसोटीतही रहाणेचा फ्लॉप शो सुरूच! रबाडाच्या चेंडूवर असा झाला बाद, पाहा व्हिडिओ

SAvsIND, 3rd Test, Live: विराट बाद झाल्याने भारताचा अर्धा संघ तंबूत; ५० षटकात पाहुण्या संघाच्या १५० धावा पार

महत्वाच्या बातम्या –

क्रिकेट अंपायर्सला मिळणारे मानधन| Cricket Umpire Salary

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---