मुंबई । इंग्लंड क्रिकेट बोर्डाने क्रिकेटची लोकप्रियता वाढवण्यासाठी हंड्रेड टूर्नामेंटचे आयोजन केले होते. मात्र कोरोना व्हायरसच्या संकटामुळे ही स्पर्धा एक वर्षापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही स्पर्धा 2021 मध्ये होण्याची शक्यता आहे. दरम्यान इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष कॉलीन ग्रेव्स यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ग्रेव्स यांच्यामते, बीसीसीआय देखील ‘हंड्रेड टूर्नामेंट’ आयोजन करण्यास उत्सुक आहे.
स्काई स्पोर्ट्स बोलताना ग्रेव्स म्हणाले की, “गेल्या एक वर्षापासून बीसीसीआय माझ्याशी नियमितपणे याविषयी बोलत आहे. यामुळे जगभरात या स्पर्धेविषयी उत्सुकता वाढली आहे. ”
यापूर्वी मिनी आयपीएल सुरू होण्याची शक्यता बीसीसीआयने विचारात घेतली होती, पण व्यस्त कार्यक्रमामुळे तसे करता आले नाही. आयसीसीच्या अध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार असलेले ग्रेव्स हे या स्पर्धेचे प्रारंभ आणि नियमित आयोजन करण्यासाठी प्राथमिकता देता आहेत.
ते म्हणाले की, “मला वाटते की ‘हंड्रेड टूर्नामेंट’ सुरू करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. लोक सुरुवातीस आम्हाला मागे सारत होते. परंतु मला असे वाटते की ते आता याचा फायदा पाहत आहेत.”
जर बीसीसीआयने या स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला, तर 2023 पूर्वी ते हे करू शकणार नाहीत. कोरोना या महामारीमुळे क्रिकेटच्या अनेक मालिका स्थगित करण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे वेळापत्रकही कोलमडून पडले आहे. त्यामुळे सध्या बीसीसीआय अशा स्पर्धा घेऊन नवीन प्रयोग करेल असे वाटत नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
-विराट कोहलीचे आरसीबीचे कर्णधारपद जाणार?, संघ मालकाने दिली प्रतिक्रिया
ट्रेंडिंग लेख-
-४ सज्जन भारतीय क्रिकेटर, ज्यांनी कधीही केले नाही दारुचे सेवन
-आज जागतिक वडापाव दिन, त्यानिमित्ताने पहा कोणत्या खेळाडूला काय आवडते?
-क्रिकेटपटू म्हणून नाव कमावूनही नेहमीच स्वत: ला एक शिक्षक मानणारा क्रिकेटर