जून महिन्यापासून क्रिकेटपासून दूर असलेला इंग्लंडचा बेन स्टोक्स पुनरागमानासाठी सज्ज झाला आहे.
पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या व्हॅटीलिटी टी-२० ब्लास्ट स्पर्धेत स्टोक्स डॅरहम संघाकडून खेळणार आहे.
व्हॅटीलिटी टी-२० ब्लास्ट स्पर्धेच्या डॅरहम जेट्स वि. यॉर्कशायर विकिंग्स यांच्यात होणाऱ्या सलामीच्या सामन्यात स्टोक्स स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमण करत आहे. हा सामना ५ जुलै रोजी हेडिंग्ले येथे होणार आहे.
अष्टपैलू स्टोक्स या सामन्यात फक्त फलंदाज म्हणुन खेळणार आहे. या सामन्यात स्टोक्स कोणत्याही अडचणी शिवाय खेळला तर त्याचा भारताविरुद्धच्या ८ जुलै रोजी होणाऱ्या अंतिम व तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी इंग्लंड संघामध्ये समावेश करण्यात येणार आहे.
जून महिन्यात पाकिस्तान विरुद्धचा पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर स्टोक्स हॅमस्ट्रींगच्या दुखापतीमुळे इंग्लंड संघातून बाहेर आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यांवेळी स्टोक्स इंग्लंड संघाबरोबर सराव करताना दिसला होता.
भारता विरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात स्टोक्सचा इंग्लंड संघात समावेश होत असल्याने कर्णधार इऑन मॉर्गन आणि इंग्लंड संघव्यस्थापना समोर मोठा पेच निर्माण होणार आहे.
सध्या संपूर्ण इंग्लंड संघ चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने स्टोक्सला कोणाच्या जागी संधी मिळणार हे पाहने औत्सुक्याचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–Video: चतुर धोनीने चहलला करुन दिली या गोष्टीची आठवण!
–कॅप्टन कूल धोनीच्या नावावर जगातील सर्वात कूल विक्रम!