आयपीएल 2025 दरम्यान इंग्लंड क्रिकेट संघाने एक मोठी घोषणा केली. (England cricket team) संघाचे अनेक खेळाडू आयपीएलमध्ये खेळत आहेत. दरम्यान, इंग्लंड क्रिकेट बोर्डाने नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. (England cricket team New captain Harry Brook) 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडल्यानंतर जोस बटलरने एकदिवसीय आणि टी20 फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. आता त्याच्या जागी हॅरी ब्रूककडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. ब्रूकने इंग्लंडसाठी अनेक वेळा दमदार कामगिरी केली आहे.
जून 2022 मध्ये बटलरला इंग्लंडचे कर्णधारपद मिळाले. इयान मॉर्गनच्या राजीनाम्यानंतर त्याने पदभार स्वीकारला. 2022 मध्ये इंग्लंडने टी20 विश्वचषक जिंकला. पण त्यानंतर 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक आणि 2024 च्या टी20 विश्वचषकात संघाला काही विशेष कामगिरी करता आली नाही. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही इंग्लंडची निराशाजनक कामगिरी झाली. संघ गट फेरीतूनच बाहेर पडला. यानंतर बटलरने राजीनामा दिला. तो सुमारे 2 वर्षे आणि 8 महिने संघाचा कर्णधार राहिला.
ब्रूकने इंग्लंडकडून 44 टी20 आणि 26 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने चांगली कामगिरी केली आहे. कर्णधारपदी नियुक्ती झाल्यावर ब्रूक म्हणाला, “इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार होणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी लहान असल्यापासून आणि व्हर्फेडेलमधील बर्ली येथे क्रिकेट खेळलो तेव्हापासून मी यॉर्कशायरचे प्रतिनिधित्व करण्याचे, इंग्लंडकडून खेळण्याचे आणि कदाचित एके दिवशी संघाचे नेतृत्व करण्याचे स्वप्न पाहिले होते. आता मला ती संधी मिळाली आहे. हे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे.”
CAPTAIN BROOK ????
— England Cricket (@englandcricket) April 7, 2025
Harry Brook is our new Men's ODI and IT20 captain!
Read more ????
ब्रूकने इंग्लंडसाठी 26 एकदिवसीय सामन्यांमध्ये 816 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने एक शतक आणि पाच अर्धशतके झळकावली आहेत. ब्रुकने 44 टी20 सामन्यांमध्ये 798 धावा केल्या आहेत. ब्रूकने इंग्लंडकडून टी20 मध्ये चार अर्धशतके झळकावली आहेत. त्याने 24 कसोटी सामनेही खेळले आहेत. या दरम्यान त्याने 2281 धावा केल्या आहेत.






