मंगळवारी (6 मे) रात्री भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील एकूण 9 दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हवाई हल्ले केले. या हवाई हल्ल्यानंतर, पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) खेळणाऱ्या इंग्लंडच्या सॅम बिलिंग्जचे (Sam Billings) ट्विट व्हायरल होत आहे.
या हवाई हल्ल्यात पाकिस्तानातील 4 आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 5 ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले, जिथून भारताविरुद्ध दहशतवादी कट रचले जात होते आणि ते राबवले जात होते. पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी 25 पर्यटकांसह एकूण 26 जणांना ठार मारले. या हल्ल्यातील दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी संबंध होते. तत्पूर्वी सॅम बिलिंग्ज सध्या पाकिस्तानमध्ये आहे, जिथे तो पीएसएलमध्ये खेळत आहे. त्याने ऑपरेशन सिंदूबद्दल ट्विट केले.
पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळणारा इंग्लिश खेळाडू सॅम बिलिंग्जने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “भारत आणि पाकिस्तानमधील तणाव लवकरात लवकर कमी व्हावा अशी प्रार्थना.”
Praying India and Pakistan situation deescalates asap ????????
— Sam Billings (@sambillings) May 6, 2025
बिलिंग्ज हा पीएसएलमध्ये लाहोर कलंदर्स संघाचा भाग आहे, ज्यांना आतापर्यंत खेळलेल्या 9 पैकी 4 सामन्यांमध्ये विजय आणि 4 सामन्यांमध्ये पराभव पत्करला आहे तर संघाचा एक सामना रद्द करण्यात आला आहे. आता संघाचा लीग टप्प्यातील शेवटचा सामना (9 मे) रोजी पेशावर झल्मीशी आहे.
काही दिवसांपूर्वी सॅम बिलिंग्जला विचारण्यात आले होते की आयपीएल आणि पीएसएलमध्ये कोणती लीग चांगली आहे, तेव्हा त्यांनी आयपीएलचे नाव घेतले होते. तो म्हणाला होता की, केवळ पीएसएलच नाही तर कोणतीही टी20 लीग आयपीएलसमोर टिकू शकत नाही.






