क्रिकेटविश्वात एकाहून एक सरस क्रिकेटपटूंची भरमार आहे. बऱ्याचदा आजी-माजी क्रिकेटपटू जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंची निवड करत स्वत:चा सर्वोत्कृष्ट संंघ तयार करत असतात. इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड यानेही नुकतीच आपल्या आवडत्या खेळाडूंची सर्वकालिन प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. यामध्ये त्याने आपल्या इंग्लंड संघातून केवळ ३ खेळाडूंची निवड केली आहे. तर भारतीय संघाच्या केवळ एका क्रिकेटपटूला स्थान दिले आहे.
ब्रॉडच्या सर्वकालिन संघात राहुल द्रविड, एमएस धोनी, विरेंद्र सेहवाग असे विस्फोटक फलंदाज जागा मिळवण्यात अयशस्वी ठरले आहेत. मात्र त्याच्या संघात माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर या एकमेव भारतीयाला जागा मिळाली आहे. त्याने मास्टर ब्लास्टर सचिनला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी निवडले आहे. याबरोबरच सचिनचा जवळचा मित्र आणि वेस्ट इंडिज दिग्गज ब्रायन लाराचीही निवड केली आहे.
इंग्लंड संघातील ऍलिस्टर कूक, मॅट प्रायर आणि संघ सहकारी जेम्स अंडरसन यांना जागा दिली आहे. याव्यतिरिक्त जगातील बलाढ्य संघांपैकी एक असणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या सर्वाधिक खेळाडूंना जागा दिली आहे. यामध्ये मॅथ्यू हेडनला सलामीवीर फलंदाज निवडले आहे. तसेच माजी क्रिकेटपटू रिकी पाँटिंग यांनाही तिसऱ्या क्रमांकावर ठेवले आहे. गोलंदाजी विभागात शेन वॉर्न आणि ग्रेन मॅकग्रा या कांगारु खेळाडूंना स्थान मिळाले आहे.
शिवाय दक्षिण आफ्रिकाचे जॅक्स कॅलिस आणि न्यूझीलंडचे रिचर्ड हेडलीही स्टुअर्ट ब्रॉडच्या संघात सहभागी आहेत. विशेष म्हणजे, ब्रॉडने इंग्लंडचे दिग्गज ऍलिस्टर कूक यांना आपल्या सर्वकालिन संघाचा संघनायक बनवले आहे.
अशी आहे स्टुअर्ट ब्रॉडची सर्वकालिन प्लेइंग इलेवन: मॅथ्यू हेडेन (ऑस्ट्रेलिया), एलिस्टर कूक (इंग्लंड), रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया), सचिन तेंडुलकर (भारत), ब्रायन लारा (वेस्ट इंडिज), जॅक्स कॅलिस (दक्षिण अफ्रीका), मॅट प्रायर (इंग्लंड), सर रिचर्ड हैडली (न्यूजीलंड), शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया), जेम्स अंडरसन (इंग्लंड), ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया)
महत्त्वाच्या बातम्या-
‘इंग्लंडला गुंडाळलं, आता भारताचा नंबर,’ न्यूझीलंडच्या दणदणीत विजयानंतर दिग्गजाचा दावा
ना २ किमी धावण्याची मेहनत, ना डच्चूची चिंता; श्रीलंकेला जाणाऱ्या खेळाडूंसाठी ‘खुशखबर’!
‘त्याच्यावर धोनीने विश्वास दाखवला नाही, मग श्रीलंका दौऱ्यावर कसे काय निवडले?’ दिग्गजाचा मोठा प्रश्न