ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) या दोन्ही संघांमध्ये ऐतिहासिक ऍशेस मालिका (Ashes series) सुरू आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने १ डाव आणि १४ धावांनी विजय मिळवला आहे, तर पहिल्या दोन कसोटी सामन्यात देखील इंग्लंड संघावर जोरदार विजय मिळवला होता. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड संघाने ३-० ची विजयी आघाडी घेतली आहे. या पराभवासह इंग्लंड संघाच्या नावे नको असलेल्या विक्रमाची नोंद झाली आहे.
इंग्लंड संघासाठी २०२१ हे वर्ष वाईट स्वप्नापेक्षा कमी नाहीये. कारण याच वर्षी इंग्लंड संघाला मायदेशात आणि परदेशात पराभवाचा सामना करावा लागला आहे. हेच कारण आहे की, इंग्लंड संघाने यावर्षी सर्वाधिक कसोटी सामने गमावले आहेत.
बॉक्सिंग डे कसोटीत १ डाव १४ धावांनी पराभूत झाल्यानंतर इंग्लंड संघाने ऍशेस मालिका गमावली आहे. हा या वर्षातील इंग्लंड संघाचा ९ वा पराभव होता. बांगलादेश संघाने देखील २००३ मध्ये ९ कसोटी सामने गमावले होते. आता १८ वर्षानंतर इंग्लंड संघाने या नको असलेल्या विक्रमात बांगलादेश (Bangladesh) संघाची बरोबरी केली आहे. (most test matches defeat in a year)
यावर्षी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता, त्यावेळी ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली गेली होती. या मालिकेतील पाचवा कसोटी सामना कोरोनामुळे रद्द करण्यात आला होता. त्यावेळी भारतीय संघ २-१ ने पुढे होता. तसेच याच वर्षी इंग्लंडचे फलंदाज देखील पूर्णपणे फ्लॉप ठरले आहेत. तसेच त्यांनी आणखी एक नको असलेल्या विक्रमात स्वतःचीच बरोबरी केली आहे. इंग्लंड संघातील फलंदाज यावर्षी सर्वाधिक ५४ वेळेस शून्यावर बाद झाले आहेत. २३ वर्षांपूर्वी देखील इंग्लंडचे फलंदाज ५४ वेळेस शून्यावर बाद झाले होते.
तसेच इंग्लंड संघाची ऑस्ट्रेलियामधील कामगिरी पाहिली, तर गेल्या १३ कसोटी सामन्यात त्यांना एकही कसोटी सामना जिंकता आली नाहीये. तिसऱ्या ऍशेस सामन्यातील पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया संघाने २६७ धावा केल्या होत्या, तर इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात अवघ्या १८५ धावा करता आल्या होत्या. तसेच इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या ६८ धावांवर संपुष्टात आला. ज्यामुळे इंग्लंड संघाला हा सामना १ डाव आणि १४ धावांनी गमवावा लागला आहे.
महत्वाच्या बातम्या
अतिशय वाईट भारतीय कर्णधार, जो विरोधी संघातील गोलंदाजांना द्यायचा सोन्याची घड्याळं भेट
तिसऱ्याच दिवशी बॉक्सिंग डे कसोटी जिंकत ऑस्ट्रेलियाने ऍशेस मालिका घातली खिशात; इंग्लंडचा डावाने पराभव
हे नक्की पाहा : विरोधी संघातील गोलंदाजांना Golden Watches भेट देणारा Captain|