---Advertisement---

ब्रॉडने अखेरच्या सामन्यात केला दुर्मिळ रेकॉर्ड, कुणीच मोडू शकणार नाही ‘हा’ विक्रम!

Stuart-Broad-Record
---Advertisement---

इंग्लंडचा वेगवान गोलंगाज स्टुअर्ट ब्रॉड याने ऍशेस 2023 मालिकेतील पाचव्या कसोटीच्या रूपात सोमवारी (दि. 31 जुलै) आपला अखेरचा सामना खेळला. ब्रॉडने त्याआधी 29 जुलै रोजीच निवृत्तीची घोषणा केली होती. इंग्लंडने या महत्त्वाच्या सामन्यात 49 धावांनी विजय मिळवला. तसेच, 5 सामन्यांची कसोटी मालिका 2-2 अशा बरोबरीने संपली. 2006मध्ये इंग्लंड संघाकडून पदार्पण करणाऱ्या 37 वर्षीय ब्रॉडचा हा 167वा कसोटी सामना होता. या सामन्यात ब्रॉडने असा पराक्रम केला, जो कदाचित कुणीच मोडू शकणार नाही.

ब्रॉडने घेतली अखेरची विकेट
ऑस्ट्रेलिया संघाच्या डावातील अखेरची विकेट स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याच्या खात्यात जमा झाली. ब्रॉने यष्टीरक्षक फलंदाज ऍलेक्स कॅरे (Alex Carey) याला बाद केले. ब्रॉड टाकत असलेल्या 95व्या षटकातील चौथा चेंडू कॅरेच्या बॅटची कड घेत यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टो याच्या हातात गेला. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाच्या डावाची अखेरची विकेट ब्रॉडच्या नावावर झाली. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाच्या डावातील 9वी विकेटही ब्रॉडनेच घेतली होती. ब्रॉडने त्याच्या अखेरच्या सामन्यातील अखेरच्या डावात 20.4 षटके गोलंदाजी करत 62 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्यापूर्वी पहिल्या डावातही ब्रॉडने 2 विकेट्स घेतल्या होत्या.

फलंदाजी करताना अखेरच्या चेंडूवर षटकार
तत्पूर्वी इंग्लंडच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करताना स्टुअर्ट ब्रॉड याने त्याच्या कारकीर्दीतील अखेरच्या चेंडूवर षटकार मारण्याचा शानदार कारनामा केला. सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपण्याच्या वेळी ब्रॉड नाबाद होता. चौथ्या दिवशी त्याने मिचेल स्टार्क याच्या चेंडूवर षटकार खेचला. हा स्टार्कच्या 81व्या षटकातील अखेरचा चेंडू होता. पुढच्या 82व्या षटकात टॉड मर्फी याच्या पाचव्या चेंडूवर जेम्स अँडरसन (James Anderson) याने विकेट गमावली. त्यामुळे इंग्लंडचा डाव 395 धावांवर संपुष्टात आला होता. या सामन्यात ब्रॉड 8 धावांवर नाबाद राहिला.

अशाप्रकारे स्टुअर्ट ब्रॉड हा कसोटी कारकीर्दीच्या अखेरच्या चेंडूवर फलंदाजी करताना षटकार मारणारा आणि अखेरच्या चेंडूवर विकेट घेणारा जगातील पहिलाच खेळाडू बनला.

ब्रॉडची कारकीर्द
स्टुअर्ट ब्रॉड याच्या कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने 17 वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत 167 कसोटी सामने खेळताना 604 विकेट्स घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त त्याने फलंदाजी करताना 3662 धावाही केल्या. त्याच्या नावावर 1 शतकही आहे. याव्यतिरिक्त ब्रॉडने वनडेत 121 सामने खेळताना 178 विकेट्स घेतल्या होत्या, तर 56 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 65 विकेट्स घेतल्या होत्या.

तसेच, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ब्रॉडने 265 सामने खेळताना 952 फलंदाजांना बाद केले होते. ब्रॉडने 2005मध्ये वयाच्या 19व्या वर्षी लीसेस्टरशायर संघासाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. (england fast bowler stuart broad wicket on last ball of career eng vs aus the ashes)

महत्त्वाच्या बातम्या-
विराटकडे वनडेत जबरदस्त रेकॉर्ड रचण्याची संधी! आजपर्यंत ‘या’ 4 दिग्गजांनाच जमलाय विक्रम
Breaking: स्टार खेळाडूने पुन्हा घेतली कसोटीतून निवृत्ती; म्हणाला, ‘आता जर स्टोक्सचा मेसेज आला, तर…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---