---Advertisement---

बॅडलक! बेअरस्टोला शतकासाठी एक धाव हवी असताना गेली शेवटची विकेट, इंग्लंडची भलीमोठी आघाडी

Jonny Bairstow
---Advertisement---

मॅनचेस्टर कसोटीच्या पहिल्या डावात जॉनी बेअरस्टो अवघी एक धाव कमी पडल्यामुळे शतक करू शकला नाही. त्याने नाबाद 99 धावा कुटल्या. पण शेवटच्या षटकात त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोस हेजलवूड याने मॅनचेस्टर कसोटीच्या पहिल्या डावात 5 विकेट्स घेतल्या. पण इंग्लंडच्या धावसंख्येवर त्याला रोख लावता आली नाही. इंग्लंड संघाने पहिल्या डावात 107.4 षटकात 592 धावांचा डोंगर उभा केला आणि ऑस्ट्रेलियावर 275 धावांची मोठी आघाडी घेतली.

तिसऱ्या दिवसाची सुरुवात इंग्लंडने 4 बाद 384 धावांपासून पुढे केली. संघाची धावसंख्या पहिल्या सत्रानंतर 8 बाद 508 धावा होती, तर दुसऱ्या सत्राआधी त्यांचा डाव 592 धावांवर गुंडाळला गेला. जॉनी बेअरस्टोसाठी हा डाव खुपच निराशाजनक राहिला. कारण अवघी एक धाव करताना आणि स्वतःची विकेट न गमावता त्याला शतक पूर्ण करता आले नाही. बेअरस्टोने अवघ्या 81 चेंडूत 99 धावा केल्या होत्या. जोश हेजलवुड () याने ऑस्ट्रेलियासाठी पाच विकेट्स घेतल्या. पण या विकेट्स घेताना त्याने 27 षटकांमध्ये 126 धावा खर्च केल्या. मिचेल स्टार्कने सर्वाधिक 137 धावा खर्च करून दोन विकेट्स घेतल्या. तर कर्णधार पॅट कमिन्सला एका विकेटवर समाधान मानावे लागले. कमिन्सने 23 षटकात 129 धावा खर्च केल्या. अष्टपैलू कॅमरून ग्रीन किफायशीर गोलंदाज ठरला. ग्रीनने 15.4 षटकात 64 धावा कर्च करून दोन विकेट्स घेतल्या.

पहिल्या डावात इंग्लंडच्या पहिल्या सात फलंदाजांपैकी एकटा बेन डकेत स्वस्तात बाद झाला. इतर सर्वच्या सर्व खेळाडूंना अर्धशतक किंवा त्यापेक्षा मोठी खेळी केली. सलामीवीर झॅक क्राउली याने 189 धावांची खेळी करत इंग्लंडला जबरदस्त सुरुवात करून दिली. सुरुवातीला त्याला मोईन अलीचा चांगली साथ मिळाली. मोईनने 54, चौथ्या क्रमांकावर आलेल्या जो रुट याने 84, तर हॅरी ब्रुक याने 61 धावांची खेळी केली. कर्णधार बेन स्टोक्स याने याही सामन्यात महत्वपूर्ण खेळी करत 51 धावा कुटल्या. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला जॉनी बेअरस्टो शतकचा दावेदार होता. पण कॅमरून ग्रीनने जेम्स अँडरसला वैयक्तिक 5 धावांवर बाद केले आणि बेअरस्टोचे शतक होता-होता राहून गेले.

तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 317 धावांवर गुंडाळला गेला. मार्नस लॅबुशेन आणि मिचेल स्टार्क यांनी प्रत्येकी 51-51 धावांची खेळी केली होती. जोन हेजलवूडप्रमाणे ख्रिस वोक्स यानेही इंग्लंडसाठी डावात पाच विकेट्स घेतल्या. वोक्सने 62 धावा खर्च करून पाच विकेट्स घेतल्या.

महत्वाच्या बातम्या –
यश धूलची पुन्हा कॅप्टन्स इनिंग! एमर्जिंग एशिया कप सेमी-फायनलमध्ये टीम इंडियाला तारले
मोईनने निवडली सीएसकेची ‘ऑल टाईम ग्रेट’ इलेव्हन! ही नावे चकित करणारी, तुम्हीही पाहा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---