पाकिस्तान आणि भारत हे दोन संघ क्रिकेटमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात. या दोन संघात गेल्या अनेक वर्षांपासून कोणताही द्विपक्षीय सामना खेळवला गेलेला नाही. किंबहुना भारत आणि पाकिस्तान संघालला एकमेकांच्या देशांचा दौरा करण्याची परवानगी नाही. मात्र, या सगळ्या आणखी एक देश असा आहे. ज्याने गेल्या १७ वर्षांपासून एकदाही पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. तो देश म्हणजे सध्याचा विश्वविजेता इंग्लंड.
इंग्लंड क्रिकेट संघ १७ वर्षानंतर प्रथमच पाकिस्तानच्या दौऱ्यावर जात आहे. पाकिस्तानसोबत इंग्लंडचा संघ ७ टी-2२० सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तानला जाणार आहे. ही टी-२० मालिका २० सप्टेंबरपासून सुरू होणार असून ती २ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. पाकिस्तान नॅशनल स्टेडियमवर २०,२२, २३ आणि २५ सप्टेंबर रोजी टी-२० सामने खेळवले जातील, तर गद्दाफी स्टेडियमवर उर्वरित तीन सामने २८ आणि ३० सप्टेंबर आणि २ ऑक्टोबर रोजी होणार आहेत. पाकिस्तान बोर्डाने इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेची घोषणा केली आहे.
आम्ही तुम्हाला सांगूया की इंग्लंड संघ टी-२० मालिकेनंतर पुन्हा परतणार आहे आणि टी-२० विश्वचषकानंतर ३ कसोटी सामने खेळण्यासाठी पुन्हा पाकिस्तानचा दौरा करणार आहे. डिसेंबरमध्ये इंग्लंडचा संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार आहे. याबाबत पीसीबीचे संचालक झाकीर खान म्हणाले, ‘आम्हाला कराची आणि लाहोरमध्ये सात टी-२० सामन्यांसाठी इंग्लंडच्या यजमानपदाची पुष्टी करताना अत्यंत आनंद होत आहे. इंग्लंड हा टॉप-रँकिंग असलेल्या टी-२० संघांपैकी एक आहे, त्यामुळे ही मालिका खूपच रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.
🗓️ 𝐒𝐚𝐯𝐞 𝐭𝐡𝐞 𝐝𝐚𝐭𝐞𝐬
📢 Great news for fans as Pakistan are set to host England after 17 years! 📢
Read more: https://t.co/iyz8N2ZEMu#PAKvENG pic.twitter.com/WX0RkoOwWx
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 2, 2022
दरम्यान,पाकिस्तान संघाने नुकताच श्रीललंकेचा दौरा केला आहे. यालवेळी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम हा चांगल्या फॉर्ममध्ये दिसला आहे. शिवाय बाबर आझम सध्या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातीलल आयसीसी क्रमवारीत झळकत आहे. दुसरीकडे इंग्लंडचा संघ अनेक समस्यांचा सामना करत आहे. काही दिवसांपूर्वी इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनने निवृत्ती जाहिर केलली. त्यानंतर संघाच्या नेतृत्वाची धुरा जॉस बटलरच्या खांद्यावर आली. त्यापाठोपाठ इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर केलली आहे.
शिवाय इंग्लंडचे अनेक खेळाडू सध्या खराब फॉर्मविरुद्ध झुंजत आहे. नुकताच इंग्लंडच्या संघाला भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे दोन्ही संघांसाठी आगामी टी-२० विश्वचषक लक्षात घेता ही मालिलका महत्वाची ठरणार आहे हे नक्की.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
VIDEO | धोनीची बरोबरी करायला निघालेला कॅरेबियन फलंदाज, अर्शदीपने उडवल्या दांड्या
विराट कोहली परतल्यानंतर ‘या’ क्रमांकावर करणार फलंदाजी, माजी दिग्गजाने स्पष्ट केले कारण
‘रोहित आणि द्रविडचं काहीतरी चाललंय!’, भुवनेश्वरची सूर्यकुमारविषयी मोठी प्रतिक्रिया