---Advertisement---

‘रोहित आणि द्रविडचं काहीतरी चाललंय!’, भुवनेश्वरची सूर्यकुमारविषयी मोठी प्रतिक्रिया

On: मंगळवार, ऑगस्ट 2, 2022 2:16 PM
Suryakumar Yadav Bhuvneshwar Kumar
---Advertisement---

भारतीय संघाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज केएल राहुल सध्या दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यात राहुल संघात पुनरागमन करण्याची शक्यता होती, मात्र ऐन वेळी कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याला या दौऱ्यातूनही माघर घ्यावी लागली. वेस्ट इंडीज विरुद्धच्या टी-२० मालिकेत भारत सध्या २-१ अशा आघाडीवर असून, सूर्यकुमार यादव पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये सलामीवीराच्या रूपात दिसला. सूर्यकुमार यादव पहिल्यांदाच डावाची सुरुवात करण्यासाठी आल्यामुळे अनेकांना याविषयी प्रश्न पडले आहेत. आता भुवनेश्वर कुमारने याविषयी खास प्रतिक्रिया दिली. 

पहिल्या टी-२० सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) सोबत सलामीसाठी आलेला सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) १६ चेंडूत २४ धावा करून बाद झाला. तर दुसऱ्या टी-२० सामन्यात त्याने ६ चेंडूत ११ धावा केल्या आणि विकेट गमावली. पहिल्या सामन्यात भारताने ६८ धावांनी विजय मिळवला होता, तर दुसऱ्या सामन्यात ५ विकेट्स राखून वेस्ट इंडीज संघ जिंकला. तिसरा सामना सुरू होण्यापूर्वी भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याने सूर्यकुमार डावाची सुरुवात करण्यासाठी का येत आहे, याविषयी अंदाज वर्तवला.

सलामीसाठी आलेल्या सूर्यकुमारविषयी भुवनेश्वरची खास प्रतिक्रिया – 
तिसरा सामना खेळण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना भुवनेश्वर म्हणाला की, “मला खरंच माहीत नाहीये. मात्र, हे नक्की आहे की, यामागे काहीतरी विचार असेल. हा असाच घेतला गेलेला निर्णय नाहीये. मला पूर्ण विश्वास आहे, कर्णधार आणि प्रशिक्षक या निर्णयातून काहीतरी खास करण्याच्या प्रयत्नात आहेत. मला हे माहीत नाही की, यामागे काय आहे, पण काहीतरी सखोल विचार नक्की आहे.”

माध्यामांसोबत बोलताना भुवनेश्वरने असेही सांगितले की, जयप्रीत बुमराह जेव्हा संघात असतो, तेव्हा त्याची जबाबदारी वेगळी असते. सध्या खेळल्या जाणाऱ्या टी-२० मालिकेत बुमराह विश्रांतीवर आहे आणि भुवनेश्वर संघातील प्रमुख गोलंदाजाची भूमिका पार पाडत आहे. परंतु, जेव्हा बुमराह संघात असतो, तेव्हा भुवनेश्वर युवा खेळाडूंसोबत चर्चा करण्यावर भर देत असतो, ज्यामुळे खेळाडूंच्या अडचणी त्याला समजतील. भारतासाठी नुकतेच अर्शदीप सिंगने पदार्पण केले. अर्शदीपला स्वतःची जबाबदारी आणि संघासाठी काय करायचे आहे, हे चांगल्या प्रकारे माहीत आहे, असेही भुवनेश्वरने पुढे बोलताना सांगितले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

पराभवानंतर वाढले भारतीय संघाचे टेंशन, फॉर्मात असलेला ‘हा’ गोलंदाज तिसऱ्या टी२०तून बाहेर

‘आता मी निश्चिंत…’, दुसऱ्या टी-२० विजयानंतर पूरनने सोडला सुटकेचा निश्वास

ओबेड मॅकॉयने लगावला विकेट्सचा ‘षटकार’, बनलाय भारताविरुद्ध ‘अशी’ कामगिरी करणारा पहिला गोलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---