इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा आणि शेवटच ऍशेस कसोटी सामना गुरुवारी (26 जुलै) सुरू होणार आहे. द ओव्हल स्टेडियमवर आयोजित केला गेला आहे. सामन्याच्या एक दिवस आधी म्हणजेच बुधवारी (25 जुलै) इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली. संघात एकही बदल नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स () म्हटल्याप्रमाणे संघातील काही खेळाडू थकले आहेत. त्यामुळे मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघात बदल अपेक्षित होता. मात्र, बुधवारी संघ घोषित झाल्यानंतर इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एकही बदल पाहायला मिळाला नाही. जेम्स अँडरसन ऍशेस 2023 मध्ये तीन सामने खेळला असून अवघ्या चार विकेट्स घेऊ शकला आहे. अशात अँडरसनला शेवटच्या कसोटीसाठी निवडण्याची शक्यता फारच कमी होती. मात्र, कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर विश्वास दाखवत पुन्हा संघात सामील केले.
ऍशेस 2023चे पहिले दोन सामने ऑस्ट्रेलियाने, तर तिसरा सामना इंग्लंडने जिंकला होता. मालिकेतील चौथा सामना निकाली निघणार असे दिसत होतो, पण पावसामुळे शेवटच्या दिवशी खेळात व्यत्यय आला आणि सामना अनिर्णित झाला. अशात ऍशेस 2023चे विजेतेपद मिळवण्याचे स्पन इंग्लंडसाठी यावर्षीही अपूर्ण राहिले. ऑस्ट्रेलियन संघाने सलग चार वेळा ऍशेस ट्रॉफी आपल्याकडे कायम ठेवली आहे. आथा शेवटच्या कसोटी विजय मिळवून इंग्लंड संघ ऑस्ट्रेलियासोबत बरोबरी करू शकतो. शेवटच्या कसोटीत जर यजमान इंग्लंडला पराभव मिळाला, तर ऑस्ट्रेलियन ही मालिका 1-3 अशा फरकाने जिंकले.
पाचव्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन –
बेन डकेत, झॅक क्राउली, मोईन अली, जो रुट, हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स (कर्णधार), जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, मार्क वुड, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन.
(England have announced their playing XI for the fifth and final Ashes Test.)
बातमी अपडेट होत आहे…
महत्वाच्या बातम्या –
ICC Ranking । रोहित टॉप 10मध्ये कायम, विराट आणि सिराजलाही फायदा
पाकिस्तानच्या सौद शकीलने घडवला इतिहास! कसोटी कारकिर्दीत कुठल्याच खेळाडूला जमली नाही ‘अशी’ सुरुवात