वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला सुरुवात होऊन आता 10 दिवस उलटले आहेत. यादरम्यान एकूण 12 सामने खेळले गेले आहेत. आता स्पर्धेतील 11व्या दिवशी 13व्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान संघ आमने-सामने आहेत. हा सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडिअममध्ये पार पडणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. यापूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला.
या सामन्यात अफगाणिस्तान संघात एक बदल करण्यात आला आहे. नजीबुल्लाह जादरान खेळणार नाहीये. त्याच्या जागी इकराम अलिखिल याला ताफ्यात सामील केले आहे. तसेच, इंग्लंड संघात कोणताही बदल नाहीये.
स्पर्धेतील कामगिरी
विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील उभय संघांची कामगिरी पाहायची झाली, तर इंग्लंड आणि अफगाणिस्तान संघ आपला तिसरा सामना खेळत आहेत. मात्र, इंग्लंड संघ आतापर्यंत खेळलेल्या 2 सामन्यांपैकी 1 सामन्यात विजयी झाला आहे, तर दुसऱ्या सामन्यात त्यांना पराभूत व्हावे लागले होते. इंग्लंड उद्घाटनाच्या सामन्यात न्यूझीलंडकडून 9 विकेट्सने पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या सामन्यात बांगलादेशचा 137 धावांनी पराभव केला होता.
दुसरीकडे, अफगाणिस्तान संघाने पहिल्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध 6 विकेट्सने पराभव पत्करला होता. त्यानंतर भारताविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही अफगाणिस्तान संघ पराभूत झाला होता. अशात अफगाणिस्तान संघ या सामन्यात स्पर्धेतील पहिल्या विजयाच्या शोधात असेल, तर इंग्लंड संघही दुसरा विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. (England have won the toss and have opted to field against afghanistan cwc23)
स्पर्धेतील 13व्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
इंग्लंड
जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वूड, रीस टोप्ले
अफगाणिस्तान
रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम जादरन, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), मोहम्मद नबी, इकराम अलिखिल, अजमतुल्ला उमरझाई, राशिद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारूकी.
हेही वाचा-
‘मास्टर ब्लास्टर’ने उडवली शोएब अख्तरची खिल्ली; ट्वीट करत जे काही म्हणाला, त्याची सर्वत्र रंगलीय चर्चा, वाचाच
‘ही माझी पॉवर…’, अंपायरच्या ‘त्या’ प्रश्नाला रोहितचे बायसेप दाखवत उत्तर, कर्णधाराच्या तोंडूनच ऐका