ऍशेस मालिकेतील पहिला कसोटी सामना मंगळवारी (20 जून) समाप्त झाला. ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंडला दोन गडी राखून पराभूत करत मालिकेत आघाडी घेतली. मात्र, इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूट याने या सामन्यातील आपल्या शानदार खेळाच्या जोरावर कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. या कसोटीत अपयशी ठरलेल्या मार्नस लॅब्युशेन याला हटवून त्याने ही जागा मिळवली.
We have a new No.1 Test batter 🎉
The latest @MRFWorldwide ICC Men’s Player Rankings have thrown up a big surprise 👇https://t.co/XvrnVBPsCq
— ICC (@ICC) June 21, 2023
ऍजबस्टन कसोटी सुरू होण्याआधी रूट सहाव्या क्रमांकावर होता. या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने नाबाद 118 व 46 धावा केल्या. दुसरीकडे प्रथम क्रमांकावरील लॅब्युशेन पहिल्या डावात शून्य तर दुसऱ्या डावात केवळ 13 धावा करून बाद झाला होता. या कामगिरीमुळे तो थेट तिसऱ्या स्थानी घसरला. त्यामुळे न्यूझीलंडच्या केन विल्यमसन दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचे ट्रेविस हेड चौथ्या तर स्टिव्ह स्मिथ सहाव्या स्थानी घसरला. या सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी सर्वोत्तम कामगिरी करणारा सलामी वीर उस्मान ख्वाजा याने कारकिर्दीतील सर्वोत्तम सातवे स्थान पटकावले.
फलंदाजांच्या क्रमवारीत मोठी उलथापालक झाली असली तरी, गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या चारमध्ये बदल झाला नाही. भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन, इंग्लंडचा दिग्गज जेम्स अँडरसन, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स हे आपले स्थान कायम राखण्यात यशस्वी ठरले.
(England Joe Root Become New Number One Test Batter He Replace Marnus Labuchagne)
महत्वाच्या बातम्या –
शाब्बास पोरींनो! भारतीय मुलींनी जिंकला इमर्जिंग आशिया कप, फायनलमध्येही श्रेयंका चमकली
वेंगसरकरांनी सांगितली धोनीच्या कर्णधार होण्याची इनसाईड स्टोरी! म्हणाले, “आम्हाला दिसले होते की…”