भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला वनडे सामना तिसऱ्या दिवशी रंगात आला आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर शनिवारी (27 जानेवारी) इंग्लंडने 126 धावांची आघाडी मिळवली. तिसऱ्या दिवसाखेर दुसऱ्या डावात इंग्लंडची धावसंख्या 6 बाद 316 धावा होती. शनिवारी भारत आणि इंग्लंडच्या मिळून एकूण 9 विकेट्स पडल्या. इंग्लंडसाठी दुसऱ्या डावात वरच्या फळीत खेळताना ओली पोप याने अप्रतिम शतक ठोकले.
इंग्लंडविरुद्धच्या या कसोटी सामन्यात पहिल्या डावानंतर भारतीय संघ 190 धावांनी आघाडीवर होता. तिसऱ्या दिवसाची सुरुवात भारताकडून रविंद्र जडेजा (81*) आणि अक्षर पटेल (35*) यांनी केली. शेवटच्या तीन विकेट्स भारतीय संघाने तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात गमावल्या. प्रत्युत्तारत इंग्लंड संघ दुसऱ्या डावात फलंदाजीला आला. सलामीवीर झॅक क्रावली 31, तर बेन डकेत 47 धावा करून बाद झाले. तिसऱ्या क्रमांकावर ओली पोप याने 208 चेंडूत 148* धावांची खेळी केली. या जबरदस्त प्रदर्शनासाठी पोपला चाहत्यांकडून स्टँडिंग ओव्हिएशन देखील मिळाले.
A standing ovation from the whole crowd in Hyderabad for Ollie Pope.
– The best day in his cricket career. pic.twitter.com/NeZu1vAuED
— Johns. (@CricCrazyJohns) January 27, 2024
चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला जो रुट 6 चेंडूत 2 धावा केल्या आणि विकेट गमावली. जॉनी बेअरस्टो 24 चेंडूत 10, कर्णधार बेन स्टोक्स 33 चेंडूत 6, तर बेन फोक्स याने 81 चेंडूत 34 धावा करून विकेट गमावली. दिवसाखेर ओली पोपसह रेहान अहमद खेळपट्टीवर कायम आहे. अहमदने 31 चेंडूत 16* धावा केल्या आहेत.
Ollie Pope’s counter-attacking century brings England back into the Hyderabad Test 🔥#WTC25#INDvENG: https://t.co/QwctE3j4Xi pic.twitter.com/kkNv9O9PT4
— ICC (@ICC) January 27, 2024
भारतीय संघासाठी इंग्लंडच्या दुसऱ्या डावात आतापर्यंत जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या आहेत. अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. (England lead by 126 runs at the end of the third day of the Hyderabad Test)
महत्वाच्या बातम्या –
हार्दिक पंड्याने पदार्पणात 228 नंबरची जर्सी का घातली होती? कारण आले समोर
शॉकिंग! दिग्गज भारतीय क्रिकेटरचा मृत्यू, गोलंदाजी करतानाच घेतला शेवटचा श्वास