---Advertisement---

कोहलीला म्हंटले होते गर्विष्ठ तर धोनीला कलंक; इंग्लंडचा ‘हा’ खेळाडू जुन्या ट्विटवरून होतोय ट्रोल

On: मंगळवार, मार्च 23, 2021 6:24 PM
---Advertisement---

ट्विटरवर ट्रोलिंग होणे, आजकाल कोणत्याच सेलिब्रेटीसाठी नवीन राहिले नाहिये. कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने त्यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. अनेकदा काही जुन्या विधानांवरून किंवा ट्विटवरून देखील त्यांना लक्ष्य केले जाते. असाच काहीसा प्रकार इंग्लंडचा फिरकीपटू मॅट पार्किन्सन याच्या बाबतीत घडला आहे.

इंग्लंडचा २४ वर्षीय लेगस्पिनर मॅट पार्किन्सन यंदाच्या भारत दौर्‍यावरील इंग्लंडच्या वनडे संघाचा भाग आहे. मात्र आता त्याला एका वेगळ्याच कारणाने सोशल मिडीयावर ट्रोल केले जात आहे. पार्किन्सनने काही भारतीय खेळाडूंबाबत केलेल्या जुन्या ट्विटमुळे तो चर्चेत आला आहे.

काय होते ट्विट?
मॅट पार्किन्सनने २०१४ साली काही ट्विट केले होते. ज्यात त्याने विराट कोहलीला गर्विष्ठ म्हंटले होते. तसेच आपण त्याचा द्वेष करत असल्याचेही ट्विट केले होते. याशिवाय त्याने विराट कोहली आणि माजी कर्णधार एमएस धोनी कलंक असल्याचेही म्हंटले होते. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात इंग्लंडकडून पदार्पण करण्यापूर्वी त्याने हे ट्विट डिलीट केले होते. मात्र चाहत्यांनी या ट्विटचे स्क्रीनशॉट घेतले होते.

https://twitter.com/Essesbee/status/1288669556005728257?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1288669556005728257%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.livehindustan.com%2Fcricket%2Fstory-england-spin-bowler-matt-parkinson-trolled-on-social-media-after-his-old-tweets-goes-viral-in-which-he-insulted-virat-kohli-and-mahendra-singh-dhoni-and-also-raises-question-on-indian-cricket-3931756.html

आता होतोय ट्रोल
भारताविरुद्ध सध्या चालू असलेल्या मालिकेत पार्किन्सन खेळण्याची शक्यता आहे. त्यानिमित्ताने हे ट्विट चाहत्यांनी व्हायरल केले असून त्यावरून आता पार्किन्सनला ट्रोल केले जात आहे. अनेक चाहत्यांनी मिम्स व्हायरल करत मॅट पार्किन्सन वर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या:

INDvsENG 1st ODI: धवनचे शतक हुकले, पदार्पणवीर कृणाल पंड्याचे वादळी अर्धशतक; इंग्लंडला विजयासाठी ३१८ धावांची गरज

अभिमानास्पद! १७ वर्षीय शेफाली वर्मा आयसीसी फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी

विराट कोहलीने वनडेमध्ये रचला इतिहास; मायदेशात सर्वात कमी डावात १० हजार धावा करणारा पहिलाच फलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---