---Advertisement---

सचिन-सेहवाग सपशेल फ्लॉप, इरफानची एकाकी झुंज; तरीही इंडिया लीजेंड्सचा ६ धावांनी पराभव

On: बुधवार, मार्च 10, 2021 7:47 AM
---Advertisement---

इंडिया लीजेंड्स विरुद्ध इंग्लंड लीजेंड्स यांच्यात मंगळवारी (९ मार्च) रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज २०२१ मधील नववा सामना झाला. या रोमांचक लढतीत इंग्लंडने अवघ्या ६ धावांनी इंडियाला पराभवाची धूळ चारली. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने निर्धारित २० षटकात ७ बाद १८८ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंडिया संघ २० षटकात ७ विकेट्स गमावत १८२ धावाच करू शकला.

नाणेफेकीचा निकाल इंडियाच्या बाजूने लागूनही त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि प्रतिस्पर्धी इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. इंग्लंडकडून कर्णधार आणि सलामीवीर केविन पीटरसनने सर्वाधिक धावा केल्या. अवघ्या ३७ चेंडूत ७५ धावांची आतिशी खेळी त्याने केली. या खेळीसाठी त्याने ५ षटकार आणि ६ चौकार मारले. त्याच्याव्यतिरिक्त इतर एकाही फलंदाजाला ३० धावांचा आकडाही गाठता आला नाही.

इंडियाकडून यूसिफ पठाणने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर इरफान पठाण आणि मुनाफ पटेल यांनीही प्रत्येकी २ फलंदाजांना बाद केले.

इंग्लंडच्या १८९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंडियाची सलामी जोडी एकेरी धावसंख्येबाद तंबूत परतली. युवराज सिंगने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु तोही २१ चेंडूत २२ धावा करत झेलबाद झाला. अखेर अष्टपैलू इरफान पठाणने मनप्रीत गोनीसोबत डावास चालना दिली. इरफानने नाबाद राहत इंडियाकडून सर्वाधिक ६१ धावा चोपल्या. यादरम्यान त्याने ३४ चेंडूंचा सामना करताना ५ षटकार आणि ४ चौकार मारले. मनप्रीतनेही नाबाद राहत ३५ धावांची साथ दिली. परंतु डावाखेर त्यांना केवळ १८२ धावा करता आल्या आणि त्यांची खेळी व्यर्थ ठरली.

इंग्लंडकडून गोलंदाजी करताना मॉन्टी पानेसरनी सर्वाधिक ३ विकेट्स चटकावल्या. जेम्स ट्रॅडवेलनेही २ विकेट्सचे योगदान दिले. तसेच मॅथ्यू हेगार्ड आणि रायन सिडबॉटम यांनी प्रत्येकी १ फलंदाज बाद केला.

महत्त्वाच्या बातम्या-

व्हिडिओ: ‘चेंडूचं माहीत नाही पण डोकं फिरलं,’ आपल्या गोलंदाजीची नक्कल करणाऱ्याला भज्जीची भन्नाट प्रतिक्रिया

अरर! भारताविरुद्ध होणाऱ्या कसोटी चॅम्पियनशीप फायनलपूर्वी न्यूझीलंडच्या चिंतेत वाढ, ‘हा’ खेळाडू दुखापतग्रस्त

चेन्नईचा संघ अंतिम फेरीत पोहोचला तर देशाऐवजी आयपीएलला प्राधान्य देणार ‘हा’ अष्टपैलू?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---